‘कुछ नहीं होता यार’ हे अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला धोक्याचा इशारा

अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही असे म्हणत जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहानदेखील त्यांनी केले.

'कुछ नहीं होता यार' हे अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिला धोक्याचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोरोना निर्बंध

मुंबई : ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूमुळे जगाची झोप उडालीय. राज्य सरकारनेदेखील या विषाणूविरोधात लढण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढवा बैठक घेतली. या बैठकीत नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच ‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही असे म्हणत जनतेने खबरदारी घेण्याचे आवाहानदेखील त्यांनी केले.

“कुछ नही होता यार” असा पवित्रा संकटात टाकू शकतो

“नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील. लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करायला हवी. केंद्राकडून येणाऱ्या सूचनांची वाट न पाहता युद्धपातळीवर जे जे गरजेचे वाटते ते निर्णय घेऊन आवश्यक पाऊले लगेच टाकावीत असे ठाकरे यांनी निर्देश दिले. तसेच आपल्या सर्वांमधील बेसावधपणा वाढला आहे. “कुछ नही होता यार” असा पवित्रा मोठ्या संकटात टाकू शकतो. मास्क न वापरणे आणि नियम तोडून अनावश्यक गर्दी करणे यावर काटेकोर कारवाई झालीच पाहिजे, असेदेखील ठाकरे म्हणाले.

लसीकरण करून घ्याच 

तसेच छोट्या छोट्या गोष्टींनी या विषाणूला प्रतिबंध होऊ शकतो हे लक्षात ठेवा. दोन्ही डोससह लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक असून प्रत्येकाने ही काळजी घेतलीच पाहिजे, असेदे ठाकरे म्हणाले.

परदेशातून आलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे गरजेचे 

तसेच परदेशातून लोक मोठ्या प्रमाणावर मुंबईत व इतर ठिकाणी येणे सुरू झाले आहे . त्यापैकी अनेक जण देशांत इतरत्र उतरून देशांतर्गत विमान सेवेने, रस्ते व रेल्वेमार्गे येतात. त्यांच्यात कुणी विषाणूचा वाहक असेल तर इतरांना मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रवाशांची तपासणी करणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने लगेच युद्ध पातळीवर कामाला लागा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चाचण्या वाढवा, आवश्यक किट्स पुरवा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात कमी झालेल्या चाचण्यांवर चिंता व्यक्त केली व चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले. विषाणूच्या नव्या प्रकाराला ओळखणारे किटस राज्यातील प्रयोगशाळांना मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

इतर बातम्या :

जुन्या वादातून पंधरा वार करुन दारुविक्रेत्या ‘मनोज’ची क्रूर हत्या, वर्धेच्या गोंडप्लॉट परिसरात घडला थरार

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त, मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहणार : योगेंद्र यादव

New Delhi | महाविकास आघाडी सरकार नव्हे तर ‘महा विश्वास घातकी’ सरकार – जावडेकर


Published On - 9:46 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI