एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त, मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहणार : योगेंद्र यादव

शेतकरी नेते तथा स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना भेट दिली. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. विशेष म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त, मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहणार : योगेंद्र यादव
yogendra yadav

मुंबई : राज्य सरकारने पगारवाढ दिल्यानंतरदेखील एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत एसटीचे विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या आंदोलनकांनी घेतलाय. या पार्श्वभूमीवर या आंदोलनाची धग आता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. शेतकरी नेते तथा स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना भेट दिली. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले. विशेष म्हणजे त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार : योगेंद्र यादव

“एसटी कर्मचाऱ्यांची मागणी रास्त आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, असे पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे,” असे योगेंद्र यादव यांनी सांगितले.

राकेश टिकैत यांनी घेतली आंदोलक कर्मचाऱ्यांची घेतली भेट 

याआधी कृषी कायद्यांना विरोध करणारे तसेच दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनीदेखील एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा, असे आवाहन राज्य सरकारला केले. एसटी संदर्भात खासगीकरण न करता आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाविकासआघाडी सरकारनं मदत करावी असे टिकैत म्हणाले.

विलीनकरणावर ठाम, आंदोलन सुरुच राहणार 

तर दुसरीकडे एसटी कर्मचारी अजूनही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणार ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे आंदोलकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला सांगितले. तर आंदोलन मागे घेतले नाही तर आम्हाला पगारवाढीवर पूनर्विचार करावा लागेल, असा सूचक इशारा यापूर्वी सरकारने दिलेला आहे.

दिवसभरात 93 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन 

दरम्यान, आंदोलक कर्मचाराऱ्यांविरोधात राज्य सरकार तसेच एसटी महामंडळाने कडक पवित्रा घेतलाय. सरकारकडून कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच सेवासमाप्तीचे निर्देश देण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण 93 संपकरी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. हा आकडा आता 6 हजार 497 पर्यंत पोहोचलाय तर आतापर्यंत एकूण 1525 जणांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आलीय. कर्मचाऱ्यांनी वेळीच संप मागे घेतला नाही तर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल असे राज्य सरकारने सांगितले आहे.

इतर बातम्या :

#PMkiShaadi | लगीन संजय राऊतांच्या लेकीचं, लग्नपत्रिकेवर लिहिलंय #PMkiShaadi; चर्चा तर होणारच!

हर्षवर्धन पाटलांच्या धरणं आंदोलनाला यश, ऊर्जा मंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य

Ultra Hot Jupiter: या ग्रहावर एक वर्ष फक्त 16 तासांचा आहे! NASA शास्त्रज्ञांना नवीन शोध


Published On - 8:51 pm, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI