डोंबिवलीच्या गुलाबी रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीबाहेर हलवणार

केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा, नाहीतर मग टाळे ठोका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना (Dombivali pink road) दिला.

Dombivali pink road, डोंबिवलीच्या गुलाबी रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीबाहेर हलवणार

डोंबिवली : हिरवा पाऊस, ऑईल मिश्रित पाऊस यानंतर डोंबिवली एमआयडीसी फेस 2 मध्ये रस्ते गुलाबी झाले (Dombivali pink road) होते. केमिकल कंपन्यांमध्ये वापरण्यात येणारे केमिकल रस्त्यावर पसरले. त्यामुळे हे रस्ते गुलाबी झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोबिंवलीतील रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी केली. यावेळी केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने नागरिक हैराण झाले असून या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा, नाहीतर मग टाळे ठोका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला.

डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दम भरला.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करावी. तसेच जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा असे आदेश आपण दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Dombivali pink road) म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करावी. तर तिसऱ्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत.

त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कुठे हलवायचं याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे ते (Dombivali pink road) म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *