Corona | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 122 वर, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 नवे रुग्ण

दिलासादायक म्हणजे 14 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. (Corona Cases in Maharashtra rises)

Corona | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 122 वर, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 10:08 AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 122 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज दुपारपर्यंत 116 होती. मात्र, मुंबईत 5 तर ठाण्यात 1 असे एकूण 6 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 15 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. (Corona Cases in Maharashtra rises) तर मुंबईतही आणखी चार जण कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलं. त्यानंतर आज संध्याकाळ मुंबईत आणखी 5 जणांना आणि ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

सांगलीतील कोरोना बाधितांवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या संकटाच्या भीषणतेची तीव्रता लक्षात येत आहे.

दिलासादायक म्हणजे 14 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 50 पुणे – 19 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 9 कल्याण – 5 नवी मुंबई – 5 नागपूर – 4 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 ठाणे – 4 सातारा – 2 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 रत्नागिरी – 1

एकूण 122 (Corona Cases in Maharashtra rises)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च

एकूण – 122 कोरोनाबाधित रुग्ण

(Corona Cases in Maharashtra rises)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.