Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 26 हजार 672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 26 हजार 672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू
Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात येत्या 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 23 May 2021 21:54 PM (IST)

  उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 392 नवे कोरोनाबाधित

  उस्मानाबाद कोरोना अपडेट:

  उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 392 रुग्ण व 12 मृत्यू तर 595 जणांना डिस्चार्ज

  उस्मानाबाद तालुका 102, तुळजापूर 51,उमरगा 49, लोहारा 50, कळंब 56, वाशी 33, भूम 22 व परंडा 29 रुग्ण

  1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
  2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
  3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
  4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
  5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
  6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
  7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
  8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
  9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
  10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
  11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
  12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
  13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
  14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
  15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
  16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
  17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
  18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
  19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
  20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
  21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू
  22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू
  23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू

  उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4456 ऍक्टिव्ह रुग्ण

  उस्मानाबाद – 2 लाख 79 हजार 951 नमुने तपासले त्यापैकी 52 हजार 369 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.70 टक्के

  46 हजार 731 रुग्ण बरे 89.23 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

  रुग्णांचा मृत्यू 1182 तर 2.25 टक्के मृत्यू दर

 • 23 May 2021 21:53 PM (IST)

  नाशिकच्या जिल्हा रुग्णलयातील सक्शन कम्प्रेशर मशीनचा पाईप ब्रेक झाल्याने काही काळ उडाली खळबळ

  नाशिकच्या जिल्हा रुग्णलयातील सक्शन कम्प्रेशर मशीनचा पाईप ब्रेक झाल्याने काही काळ उडाली खळबळ
  – तात्काळ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
  – मात्र कोणतीही हानी नाही अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक निखिल सैनदाने यांची माहिती
  – लहान मुलांसाठी वापरलं जातं होत मशीन
  – पाईप ब्रेक झाल्याने धूर होत असल्यामुळे अग्निशमन दलाला केलं होतं पाचारण
  – कोविडची ऑक्सिजन लाईन आणि या मशीनचा काहीही संबंध नाही,या मशीनची लाईन पूर्णतः वेगळी आहे.

 • 23 May 2021 21:10 PM (IST)

  वसई-विरारमध्ये दिवसभरात 179 नवे कोरोनाबाधित

  वसई-विरार कोरोना अपडेट :

  मागच्या 24 तासात 179 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह.. तर आज दिवस भरात 05 जणांचा मृत्यू ….600 जणांनी केली कोरोनावर मात…

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 63,878

  कोरोना मुक्त झालेली रुग्ण संख्या 56,044

  आजपर्यंत कोरोनाने मृत्यू झालेली रुग्ण संख्या 1306

  कोरोनावर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 6528

 • 23 May 2021 20:21 PM (IST)

  जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 362 नवे कोरोनाबाधित, 9 जणांचा मृत्यू

  जळगाव कोरोना अपडेट :

  कोरोना रुग्ण -362
  कोरोनामुक्त -857
  सध्या रुग्ण– 7802
  मृत्यू – 09

  आत्तापर्यंत
  कोरोना रुग्ण -138313
  कोरोनामुक्त –128024
  मृत्यू – 2487

 • 23 May 2021 20:18 PM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 355 नवे कोरोनाबाधित

  चंद्रपूर:

  गेल्या 24 तासात 355 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 12 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 80955

  एकूण कोरोनामुक्त : 73836

  सक्रिय रुग्ण : 5751

  एकूण मृत्यू : 1368

  एकूण नमूने तपासणी : 455488

 • 23 May 2021 20:13 PM (IST)

  राज्यात दिवसभरात 26 हजार 672 नवे रुग्ण, 594 जणांचा मृत्यू

  राज्यात आज 26 हजार 672 नवे रुग्ण
  29 हजार 177 रुग्ण बरे
  594 जणांचा मृत्यू

 • 23 May 2021 19:18 PM (IST)

  सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात 2180 नवे कोरोनाबाधित, 35 जणांचा मृत्यू

  सोलापूर :

  जिल्ह्यात आज एकूण 2180  रुग्ण बरे

  तर 1536 कोरोनाचे नवीन रुग्ण

  कोरोनामुळे आज जिल्ह्यात 35 जणांचा मृत्यू

  जिल्ह्यातील  एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15307

  एकूण कोरोना बाधितांपैकी ग्रामीण भागातील 1503 पॉझिटिव्ह तर शहरातील 33 जणांचा समावेश

 • 23 May 2021 19:16 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1103 नवे कोरोनाबाधित

  नाशिक जिल्हा कोरोना अपडेट :

  आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1177

  आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 1103

  नाशिक मनपा- 357
  नाशिक ग्रामीण- 720
  मालेगाव मनपा- 026
  जिल्हा बाह्य- 00

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4371

  आज कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -33
  नाशिक मनपा- 09
  मालेगाव मनपा- 02
  नाशिक ग्रामीण- 22
  जिल्हा बाह्य- 00

 • 23 May 2021 19:00 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 2326 जणांची कोरोनावर मात, 1042 नवे कोरोनाबाधित

  नागपूर :

  नागपुरात आज 2326 जणांनी केली कोरोनावर मात

  1042 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  एकूण रुग्ण संख्या – 471059

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 448357

  एकूण मृत्यू – 8768

 • 23 May 2021 18:45 PM (IST)

  नवी मुंबईत आता अतिदिव्यांग व्यक्तींचे घरीच होणार कोविड लसीकरण

  नवी मुंबई :

  अतिदिव्यांग व्यक्तींचे घरीच होणार कोविड लसीकरण !

  आता कोविड लसीकरणासाठी वेगळी रांग लावण्याची आवश्यकता नाही

  तसेच दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी आठड्याच्या सातही दिवस वेगळी रांग

  राष्ट्रवादीच्या मल्लिकार्जुन पुजारी यांनी पालिका आयुक्त यांची भेट घेऊन दिले निवेदन

  पुजारी यांची त्वरित मान्य करत मनपा अति दिव्यांगाना घरीच लस देणार

  आता दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरणात अडचण होणार नाही

 • 23 May 2021 18:41 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 709 नवे कोरोनाबाधित, 60 रुग्णांचा मृत्यू, तर 2324 रुग्णांना डिस्चार्ज

  पुणे :
  – दिवसभरात ७०९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  – दिवसभरात २३२४ रुग्णांना डिस्चार्ज.
  – पुण्यात करोनाबाधीत ६० रुग्णांचा मृत्यू. २१ रूग्ण पुण्याबाहेरील.
  – १२९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६५६२५.
  – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०६७६.
  – एकूण मृत्यू -८००७.
  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४६९४२.
  – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९०६६.

 • 23 May 2021 18:15 PM (IST)

  पालकमंत्र्यांचे सांगली जिल्ह्यातील लॉकडॉऊन वाढवण्याचे संकेत

  सांगली –
  सांगली जिल्ह्यातील लॉकडॉऊन वाढवण्याचे पालकमंत्र्यांची संकेत, पॉझिटिव्हिटी दर कमी येत नसल्याने लॉकडाऊन वाढवण्याचे प्रशासन आणि अनेकांचे मत, मात्र पुढील काही दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे केले स्पष्ट

 • 23 May 2021 17:43 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 270 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू, तर 656 बाधितांची कोरोनावर मात

  वाशिम कोरोना अपडेट :

  जिल्ह्यात दिवसभरात 270 नवे रुग्ण, 13 जणांचा मृत्यू, तर 656 बाधितांची कोरोनावर मात

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 9 दिवसात 64 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 3556 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 4664 कोरोनामुक्त झालेत

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 38241

  सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 3357

  आतापर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण – 34463

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 420

 • 23 May 2021 15:41 PM (IST)

  सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गरजू-बेघरांसाठी जयंत थाळी उपक्रम

  सांगली :
  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात गरीब गरजू, बेघरासाठी जयंत थाळी उपक्रम राबवला जात आहे.राष्ट्रवादी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने रोज 500 थाळ्याचे मोफत वाटप सुरू आहे.

 • 23 May 2021 14:07 PM (IST)

  विरारच्या रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये राडा, व्हिडीओ व्हायरल

  विरार:- विरारच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर मध्ये राडा

  डॉक्टर ने चुकीची ट्रीटमेंट करत स्वताची जबाबदारी झटकल्याचा आरोप करीत रुग्णाचे नातेवाईकांनी बालाजी हॉस्पिटलचे डॉक्टर ला धक्काबुकीं केली असल्याचे आले समोर

  धक्काबुकीं करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल

  विरार पूर्व स्टेशन परिसरात आहे बालाजी हॉस्पिटल

  याबाबत विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून चौकशी सुरू

 • 23 May 2021 12:17 PM (IST)

  मेडिकल असोसिएशनचा राज्य सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेटम

  मेडीकल दुकानदारांच लसीकरण तातडीनं करा,

  कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी,

  मेडिकल असोसिएशननं दिला पाच दिवसांचा अल्टीमेटम,

  पाच दिवसात लसीकरणाचा निर्णय घेतला नाही तर राज्यातील मेडीकल दूकानदार जाणार संपावर,

  मेडिकल दूकानदारांनी दिला संपाचा इशारा,

  28 तारखेला मेडिकल कार्यकारिणीची राज्यव्यापी बैठक

  पुणे जिल्हा मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शहा यांची माहिती

 • 23 May 2021 11:20 AM (IST)

  नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच नागपूरकर सैराट, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

  नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं पाहून अनेक जण पडत आहे घराबाहेर

  मात्र रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  बिनाकामाने बाहेर पडणाऱ्यांवर केली जात आहे कठोर कारवाई

  ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी सुरु

 • 23 May 2021 11:11 AM (IST)

  चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने स्वबळावर उभारले 50 खाटांचे कोव्हिड केंद्र

  चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी ग्रामपंचायतीने स्वबळावर उभारले 50 खाटांचे कोविड केंद्र.

  चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ झाली असली तरी कोविड केंद्रे कमी असल्याने उपचारात हयगय होत होती. आडवळणाच्या ‘पाथरी’ या गावाने जि. प. शाळेत उभारले केंद्र… केवळ समाजाच्या मदतीतून समर्थपणे केंद्रचालविले जात आहे…

 • 23 May 2021 09:54 AM (IST)

  सांगली मार्केट यार्ड बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  सांगली

  आजपासून मार्केट यार्ड बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारीचे आदेश

  जिल्ह्यात 19 मे ते 26 मे अखेर कडक लॉकडाऊन सध्या सुरू आहे

  19 मे ते 22 मे या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा , साहित्य खरेदी करणेची दिली होती मुभा

  मात्र जिल्ह्यात रुग्ण संख्या आणि मृत्यू प्रमाण सतत वाढत आहे

 • 23 May 2021 09:53 AM (IST)

  पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात, लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन

  पुणे

  कोरोनाची दूसरी लाट ओसरायला सुरुवात,

  लहान मुलांची पालकांनी काळजी न करता लसीकरण करून घेण्याचं आवाहन आवाहन

  पावसाळ्याच्या आधी विविध संक्रमित आजाराच्या लसी विविध केंद्रावर उपलब्ध,

  पालकांनी कोरोनाची भीती न बाळगता केंद्रावर जाऊन लहान मूलांना लस घेण्याचं आवाहन,

  तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता नियमित लसीकरण करून घेण्याच्या विभागीय टास्क फोर्सच्या सूचना,

  तिसऱ्या लाटेत लहान मूलांना बाधित होण्यापासून वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू,

  विभागीय टास्क फोर्स समितीनं पालकांना केलं आवाहन,

 • 23 May 2021 09:52 AM (IST)

  पुण्यात Vaccination on wheels या लसीकरण मोहिमेला सुरुवात

  पुणे :

  पुण्यात Vaccination on wheels या लसीकरण मोहिमेला सुरुवात…

  महापालिकेने वृद्धाश्रम,अपंग, अंध व्यक्ती, अनाथाश्रम या ठिकाणी थेट जाऊन केलं लसीकरण

  शनिवारी निवारा वृद्धाश्रमात जाऊन १८० ज्येष्ठ नागरिकांना दिली लस…

  शहरातील कुठलीही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी पालिकेची मोहीम

 • 23 May 2021 08:01 AM (IST)

  बुलडाण्यात दारू विक्री जोमात, 93 हजार 772 लीटर दारुची विक्री

  बुलडाणा

  जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद, मात्र दारू विक्री जोमात,

  गतवर्षीच्या तुलनेत 93 हजार 772 लीटर अधिक दारूची झाली विक्री,

  तर लॉकडाऊन काळात 1 कोटींची दारू जप्त,

  शिवाय बिअर विक्री घटली असून देशीला पसंती मिळाली.

 • 23 May 2021 07:59 AM (IST)

  नागपुरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत बॅरिकेटस, कंन्टेन्मेंट झोन वर 5. 71कोटी चा खर्च

  नागपूर –

  कोरोनाच्या पहिल्या लाटेत बॅरिकेटस , कॅटेंटमेंट झोन वर 5. 71कोटी चा खर्च

  सर्वाधिक 1.11 कोटी खर्च मंगळवारी झोन मध्ये

  स्थायी समितीने दिली मंजुरी

  पहिल्या लाटेत मोठया प्रमाणात रुग्ण बाधित झाले होते

  तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरकारच्या आदेश नुसार वस्त्या सील केल्या होत्या

  त्यासाठी बॅरिकेटस टिन लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाला खर्च

 • 23 May 2021 07:58 AM (IST)

  पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना चाचणी केंद्रांमध्ये वाढ, 10 ठिकाणी दिवसभर होणार चाचणी

  पिंपरी चिंचवड

  -शहरातील चाचणी केंद्रांमध्ये वाढ; आता 10 ठिकाणी दिवसभर होणार कोरोना चाचणी

  -सकाळी 8 वाजल्यापासून चाचण्या करण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक केंद्राच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यापूर्वी फक्त तीन केंद्रांवर दिवसभर चाचणी केली जात होती

  -पूर्वी कोरोना चाचणी केंद्राची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे

  ‘या’ केंद्रांवर होणार कोरोना चाचणी

  संभाजीनगर -बीएसएनएल आरटीटीसी सेंटर : सकाळी 9 ते रात्री 9

  तानाजीनगर -चिंचवडगाव तालेरा रुग्णालय : सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

  संत तुकारामनगर-यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) : सकाळी 8 ते रात्री 8

  खराळवाडी-बालभवन : सकाळी 9 ते दुपारी 3.30

  पिंपरी कॅम्प- जुने जिजामाता रुग्णालय : सकाळी 8 ते रात्री 8

  पीसीएमटी चौक- भोसरी रुग्णालय : सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत

  निगडी- यमुनानगर रुग्णालय : सकाळी 8 ते रात्री 8

  चिखली –म्हेत्रेवस्ती दवाखाना : सकाळी 9 ते दुपारी 1

  थेरगाव- खिंवसरा पाटील रुग्णालय : सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत

  पिंपळेगुरव-बॅडमिंटन हॉल :सकाळी 9.30 ते दुपारी 4

 • 23 May 2021 07:56 AM (IST)

  पिंपरी-चिंचवडमध्ये दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

  पिंपरी चिंचवड

  -पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी भागातील दोन सख्या भावाचा कोरोनाने मृत्यू

  -अपूर्व जाधव आणि आदित्य जाधव असं कोरोना मुळे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे

  -दोघांच कोरोना चाचणी अहवाल 20 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता

  -गुरुवारी दुपारी अपूर्व जाधव आणि शनिवारी पहाटे आदित्य जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

  -यादरम्यान अपूर्व आणि आदित्य यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर त्याच्या घरातील दोघा सह आई,वडील आणि आदित्य यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली तर आदित्य जाधव यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता तर अपूर्व चा विवाह येत्या दिवाळी मध्ये होणार होता

  -ह्यामध्ये आई आणि आदित्यची पत्नी कोरोनामुक्त झाले आहेत तर वडिलांवर रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत

  -या दोघांच्या मृत्यूमुळे आकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे

 • 23 May 2021 07:54 AM (IST)

  पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढत, 461 जणांवर उपचार सुरु

  पुणे :

  पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढत

  शहरासह जिल्ह्य़ात ४३ विविध रुग्णालयांमध्ये तब्बल ४६१ काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचार सुरू

  सध्या पुणे शहरात ३७३, पिंपरी-चिंचवडमध्ये ७८ आणि ग्रामीण भागात १२ अशा एकू ण ४६३ रुग्णांवर उपचार सुरू

  १३ मेपासून आतापर्यंत तब्बल १७२ नव्या रुग्णांची भर

  जिल्ह्यात म्युकरमायक्रोसिसच्या औषधांचा तुटवडा

  जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत देण्यात आली माहिती

 • 23 May 2021 07:53 AM (IST)

  पुण्यातील 88 खासगी हॉस्पिटलच्या फायर ऑडिटमध्ये त्रुटी, तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना

  पुणे :

  खासगी हॉस्पिटलच्या फायर ऑडिटमध्ये शहरातील 88 हॉस्पिटलमध्ये गंभीर त्रुटी

  खासगी हॉस्पिटल्सला फायर ऑडिटमधील त्रुटी दूर करण्यासाठी एक ते तीन आठवड्यांचा देण्यात आला कालावधी

  जिल्हा प्रशासनाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हॉस्पिटलचे करण्यात येत आहे फायर ऑडिट

  दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित रुग्णालयांनी तातडीने दुरुस्ती करण्याच्या संबंधित रुग्णालयांना सूचना

 • 23 May 2021 07:52 AM (IST)

  नाशिक शहरात कोरोना रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी, दोन रुग्णालयांविरोधात गुन्हा

  नाशिक

  – नाशिक शहरातील दोन हॉस्पिटलला कोरोना रुग्णांना जादा बिल आकारणी भोवली..
  – मनपा आयुक्त कैलास जाधव यांची मोठी कारवाई
  – मेडिसिटी आणि रामालयम या दोन हॉस्पिटलची कोविडची मान्यता रद्द करत गुन्हे दाखल करण्याचे आदेश
  – अनके नियम या हॉस्पिटलने धाब्यावर बसवत काम सुरू ठेवल्याने करण्यात आली कारवाई

 • 23 May 2021 07:50 AM (IST)

  नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 500 च्या खाली, फक्त 15 हजार सक्रीय रुग्ण

  नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 500 च्या खाली

  त्यामुळे चिंता कमी झाली

  गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1हजार 86 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

  तर 26 जणांचा मृत्यू झाला

  बरे होणाऱ्यांचं प्रमाण 94.90 टक्के वर पोहचल

  जिल्ह्यात आता 15 हजार 242 सक्रिय रुग्ण

 • 23 May 2021 07:48 AM (IST)

  पुण्यात ऑक्सिजनची मागणी तब्बल 40 टक्‍क्‍यांनी घटली

  पुणे –

  मागील 20 दिवसांत जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी तब्बल 40 टक्‍क्‍यांनी घटली

  मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पुणे शहरातील बाधित संख्येत लक्षणीय घट झाली. त्यामुळे ऑक्‍सिजनच्या मागणीत झाली घट

 • 23 May 2021 07:48 AM (IST)

  नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत घट, रुग्णसंख्येत घट

  नाशिक

  – नाशिक जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्या घटल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही घट
  – 106 मेट्रिक टन मधून 89 मेट्रिक टनचीच दिवसभरात पडतीये गरज
  – 17 मेट्रिक टन ऑक्सिजन पडतोय शिल्लक
  – जिल्ह्यातील रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा
  – काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन साठी खूप वणवण करावी लागत होती,आता मात्र चित्र बदललं..

 • 23 May 2021 07:47 AM (IST)

  नागपुरात 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार

  नागपूर –

  शासनाचे निर्देशानुसार 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाईल.

  ज्या नागरिकांनी पहिला डोस 12 आठवड्यांपूर्वी घेतला, त्यांना दुसरा डोस दिला जाईल.

  मनपाच्या सर्व केंद्रांवर लसीकरण केल्या जाईल.

  आरोग्य सेवक, फ्रंट लाइन वर्कर यांना सुद्धा दुसरा डोस दिला जाणार आहे.

  तसेच ड्राइव इन व्हॅक्सिनेशन केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल.

 • 23 May 2021 07:08 AM (IST)

  नाशिककरांसाठी चिंतादायक बातमी, रुग्णसंख्येत घट होत असताना मृत्यूचं प्रमाण वाढलं

  नाशिक

  – नाशिक जिल्हावासियांसाठी काहीशी चिंतादायक बातमी
  – दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना, मृत्यूच प्रमाण मात्र वाढलं
  – गेल्या 24 तासात जिल्ह्यात 1222 रुग्ण पॉझिटिव्ह तर 58 रुग्णांचा मृत्यू
  – सर्वाधिक 39 मृत्यू हे ग्रामीण भागात

 • 23 May 2021 07:02 AM (IST)

  नागपूर महापालिकेची अभिनव मोहिम, ‘लसीकरण आपल्या परिसरात’ द्वारे नागरिकांचे लसीकरण

  नागपूर

  शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका ‘लसीकरण आपल्या परिसरात’ ही अभिनव मोहीम सोमवार, २४ मेपासून राबविणार आहे.

  या मोहिमेत ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाईल.

  स्लम, जुन्या वस्त्या व दाट वस्तीत लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

  जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी अशा वस्त्यांत प्रामुख्याने ही मोहीम राबविली जाणार आहे.

  सोमवारपासून प्रत्येक झोनच्या लसीकरण केंद्राच्या परिसरात नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल.

  आठवड्यातील प्रत्येक दिवशी झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येईल.

 • 23 May 2021 06:56 AM (IST)

  पुणे शहराला कोव्हॅक्सिन लसीचा एकही डोस नाही, फक्त कोव्हीशिल्ड लस उपलब्ध

  पुणे

  पुणे शहराला कोव्हँक्सिन लसीचा एकही डोस मिळाला नाही

  कोव्हँक्सिनसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांच लसीकरण होणार नाही,

  आज फक्त कोव्हीशिल्ड लसीचा मिळणार पहिला आणि दूसरा डोस,

  शहरातील 70 केंद्रावर मिळणार पहिला आणि दूसरा डोस,

  महापालिकेला शनिवारी रात्री प्राप्त झाल्यात 13 हजार कोव्हीशिल्ड लसीचे डोस,

  दोन दिवसांपासून बंद असलेलं लसीकरण आजपासून सुरळीत होणार,

  8 वाजता ऑनलाईन स्लॉट बुकींगला होणार सुरुवात ….

 • 23 May 2021 06:52 AM (IST)

  पुण्यात इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 109 जणांवर पोलिसांची कारवाई, 54 हजाराचा दंड वसूल

  पुणे

  पुण्यात इव्हीनिंग वॉक करणाऱ्या 109 पुणेकरांवर पोलिसांची कारवाई,

  संचारबंदीचे नियम असतानाही आदेशाचं उल्लंघन करत पुणेकर ट्रॅकवरती करत होते वॉकींग,

  धायरी गावातील कँनॉल ट्रॅकवर फिरत होते नागरिक

  पोलिसांनी मैदानाला सगळ्या बाजूंनी घेरा घालत फिरायला आलेल्या सगळ्यांवर केली कारवाई

  प्रत्येकाकडून 500 रूपयांचा दंड वसूल करत 54 हजार दंडाची रक्कम केली गोळा,

  पुण्यातील सिंहगड रस्ता, तळजाई पठार, पर्वती पायथ्याला नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फिरायला करततात गर्दी,

  अनेकांकडून लॉकडाऊनचे नियम बसवले जातायेत धाब्यावर….

 • 23 May 2021 06:41 AM (IST)

  कोल्हापूरकरांना दिलासा, जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल

  कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल

  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या रविवारपासून सुरू होते कडक लॉकडाऊन

  जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जारी

  राज्य सरकारच्या लॉकडाऊनचे नियम मात्र कायम राहणार

  रविवारी रात्री 12 वाजल्यापासून कडक लॉकडाऊनचे नियम शिथिल

 • 23 May 2021 06:40 AM (IST)

  मुंबईतील लसीकरण केंद्र आज बंद, मुंबई महापालिकेची माहिती

  आज मुंबईत लसीकरण केंद्र बंद

  मुंबई शहरातील सर्व कोरोना लसीकरण केंद्र बंद

  मुंबई महापालिकेचे ट्वीटद्वारे माहिती

  सोमवारी लसीकरण केंद्राबद्दलची अपडेट दिली जाणार

 • 23 May 2021 06:36 AM (IST)

  राज्यात दिवसभरात 26 हजार 133 नवे रुग्ण, 682 जणांचा मृत्यू

  राज्यात काल 26 हजार 133 नवे रुग्ण

  40 हजार 294 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  682 रुग्णांचा मृत्यू

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI