कोरोनाची दहशत! आर्थर रोड कारागृहातून 400 कैदी हलवले

कोरोनाचा वाढता धोका पाहता आर्थर रोड कारागृहातून 400 कैद्यांना (Prisoners Shift to Taloja Jail ) तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.

कोरोनाची दहशत! आर्थर रोड कारागृहातून 400 कैदी हलवले

मुंबई : कोरोनाचा वाढता धोका पाहता (Novel Corona Virus) आर्थर रोड कारागृहातून 400 कैद्यांना (Arther Road Jail Prisoners Shifting) तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाने (Arther Road Jail Prisoners Shifting) हा निर्णय घेतला आहे.

आर्थर रोड कारागृहाची क्षमता 805 कैदी सामावण्याची आहे. मात्र, सध्या तिथे 3,400 कैदी होते. यापैकी 400 कैद्यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. तसेच, विविध गुन्हे प्रकरणातील सुनावणीसाठी कैद्यांना पुढचे काही दिवस न्यायालयात नेलं जाणार नाही, असाही निर्णय घेण्यात आला नाही. तर, अत्यावश्यक सुनवाणी प्रकरणं ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होतील.

हेही वाचा : Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

आर्थर रोड कारागृहात दोन बराक आयसोलेशन वॉर्डसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कैद्यांना निसर्गोपचारही देण्यात येणार आहे.

आर्थर रोडप्रमाणे ठाणे, कल्याण मधील (Arther Road Jail Prisoners Shifting) जादा कैदी तळोजा कारागृहात हलवणार असल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहाची क्षमता जास्त आणि कैद्यांची संख्या इतर कारागृहांच्या तुलनेने कमी असल्याने त्या कारागृहात कैद्यांना हलवण्यात येत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा महिला बळी

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Maharashtra corona first death) झाला आहे. तर राज्यात कोरोना बाधितांची संख्या 39 वर गेली आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • पिंपरी चिंचवड – 9
 • पुणे – 7
 • मुंबई – 6
 • नागपूर – 4
 • यवतमाळ – 3
 • कल्याण – 3
 • नवी मुंबई – 3
 • रायगड – 1
 • ठाणे -1
 • अहमदनगर – 1
 • औरंगाबाद – 1
 • एकूण 39

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

 • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
 • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
 • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
 • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
 • नागपूर (1) – 12 मार्च
 • पुणे (1) – 12 मार्च
 • पुणे (3) – 12 मार्च
 • ठाणे (1) – 12 मार्च
 • मुंबई (1) – 12 मार्च
 • नागपूर (2) – 13 मार्च
 • पुणे (1) – 13 मार्च
 • अहमदनगर (1) – 13 मार्च
 • मुंबईत (1) – 13 मार्च
 • नागपूर (1) – 14 मार्च
 • यवतमाळ (2) – 14 मार्च
 • मुंबई (1) – 14 मार्च
 • वाशी (1) – 14 मार्च
 • पनवेल (1) – 14 मार्च
 • कल्याण (1) – 14 मार्च
 • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
 • औरंगाबाद (1) – 15 मार्च
 • पुणे (1) – 15 मार्च
 • मुंबई (3) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • यवतमाळ (1) – 16 मार्च
 • नवी मुंबई (1) – 16 मार्च
 • एकूण – 39 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

 • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
 • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
 • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
 • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Arther Road Jail Prisoners Shifting

संबंधित बातम्या :

कोरोनाची धास्ती! तुळजापूर, सिद्धिविनायकासह अनेक मंदिरं दर्शनासाठी बंद

ताश्कंदमध्ये भारतीय प्रवासी अडकले, शरद पवारांकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

Corona : दिल्लीत कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण बरा, कोरोनाला कसे हरवले? लढाई जिंकणाऱ्या पठ्ठ्याची कहाणी

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *