Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : आज राज्यात 35 हजार नवे कोरोना रुग्ण, 39 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाच्या वेगवान अपडेट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: दादासाहेब कारंडे, Tv9 मराठी

Updated on: Jan 31, 2022 | 10:47 PM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : आज राज्यात 35 हजार नवे कोरोना रुग्ण, 39 रुग्णांचा मृत्यू, कोरोनाच्या वेगवान अपडेट
कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण
Image Credit source: TV9

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 39 हजार 15 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 27 हजार 711 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर, रविवारी ओमिक्रॉनच्या 5 रुग्णांची नोंद झाली. हे सर्व रुग्ण पुण्यात आढळले आहेत. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3130 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1674 जणांना बरे झाल्यामुळं घरी सोडण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 31 Jan 2022 10:02 PM (IST)

  मुंबईतल्या कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजाराच्या खाली

  #CoronavirusUpdates 31st January, 6:00pm

  Positive Pts. (24 hrs) – 960 Discharged Pts. (24 hrs) – 1837

  Total Recovered Pts. – 10,17,288

  Overall Recovery Rate – 97%

  Total Active Pts. – 9900

  Doubling Rate – 421 Days

  Growth Rate (24Jan – 30Jan)- 0.16%#NaToCorona

  — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 31, 2022

 • 31 Jan 2022 09:58 PM (IST)

  आज राज्यात 35 हजार नवे कोरोना रुग्ण, 39 रुग्णांचा मृत्यू

 • 31 Jan 2022 09:14 PM (IST)

  पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयं होणार सुरू

  उद्यापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालयं उद्यापासून होणार सुरू,

  उद्यापासून विद्यापीठात कर्मचाऱ्यांची 100 टक्के असणार हजेरी,

  फर्ग्युसन महाविद्यालयानं काढलं परिपत्रक

  कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचे आदेश

  50 टक्के विद्यार्थी उपस्थितीत होणार महाविद्यालय सुरू

 • 31 Jan 2022 08:12 PM (IST)

  उद्या पुण्यातील ग्रामीण भागातील 1 ली 8 वीच्या शाळा होणार सुरू

  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आदेश,

  कोरोनाचे नियम पाळून शाळा होणार सुरू,

 • 31 Jan 2022 08:01 PM (IST)

  नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळांबाबत मोठा निर्णय

  नागपूर महानगरपालिका हद्दीतील 1ली ते 12 वी चे वर्ग उद्या 1 फेब्रुवारी पासून होणार सुरू..

  शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस असणार बंधनकारक..

  विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागणार,

  शाळेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे असणार अनिवार्य..

  महापालिकेने काढले आदेश ..

  ग्रामीण संदर्भात अजून निर्णय नाही

 • 31 Jan 2022 06:54 PM (IST)

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज 2160 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

  15 जणांचा मृत्यू तर 3914 जणांनी केली कोरोना वर मात

 • 31 Jan 2022 06:24 PM (IST)

  पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा घसरला

  दिवसभरात 2 हजार 56 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात रुग्णांना 3 हजार 263 डिस्चार्ज. - पुणे शहरात करोनाबाधीत 9 रुग्णांचा मृत्यू

 • 31 Jan 2022 06:22 PM (IST)

  वसई-विरार महापालिका हद्दीतील 5 ते 7 वीपर्यंतच्या सर्व शाळा उद्या 1 फेबुरवारी पासून होणार सुरू

  1 ली ते 4 थीपर्यंतच्या शाळा मात्र 7 फेबुरवारी पासून होणार सुरू..

  - 8 वी ते 12 वी च्या शाळा, कॉलेज मात्र या पूर्वीच झाल्या आहेत सुरू..

  - शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्या नंतर, शासनाने दिलेले नियम योग्य रीतीने शाळा व्यवस्थापन पाळताहेत का? यात आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक तपासण्यासाठी महापालिकेचे नेमलेले पथक फिरणार आहे.

  - नेमलेल्या पथकात प्रभागनिहाय नोडेल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

 • 31 Jan 2022 05:46 PM (IST)

  औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पहिली ते सातवीच्या शाळा होणार सुरू

  उद्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पहिली ते सातवीच्या शाळा होणार सुरू..

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत घेतला शाळा सुरू करण्याचा निर्णय..

  नियमांचे पालन करूनच दिला जाणार विद्यार्थ्यांना प्रवेश..

  मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी काढले पत्रक..

  पालकांना द्यावा लागणार विद्यार्थ्यांचे संमतीपत्र..

 • 31 Jan 2022 05:44 PM (IST)

  चंद्रपूर : कोरोना अपडेट 31-1-2022

  आजचे कोरोना बाधित -58

  कालचे कोरोना बाधित - 282

  आजचे कोरोनामुक्त -529

  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह - 2627

  आजचे बाधित मृत्यू - 01

 • 31 Jan 2022 04:44 PM (IST)

  विद्यार्थ्यांच्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश

  गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

  परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगण्यात आलं

  सुत्रांची माहिती

 • 31 Jan 2022 03:09 PM (IST)

  परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेराव घातला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. ऑफलाईन परीक्षेला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

 • 31 Jan 2022 02:50 PM (IST)

  अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड यात्रा कोरोनामुळे यंदाही रद्द

  हाजी मलंग बाबा दर्गा ट्रस्ट, प्रांत अधिकारी आणि पोलीस उपायुक्त यांच्या बैठकीत निर्णय

  11 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान होणार होती यात्रा

  मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय

 • 31 Jan 2022 01:45 PM (IST)

  टीईटी घोटाळ्यातील IAS अधिकारी आरोपी सुशील खोडवेकरला कोरोनाची लागण

  टीईटी घोटाळ्यातील IAS अधिकारी आरोपी सुशील खोडवेकरला कोरोनाची लागण

  नायडू रुग्णालयात आरोपी दाखल केल्याची सूत्रांची माहिती

  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सुनावणी

  न्यायालयीन कोठडीत आरोपीची होणार रवानगी

 • 31 Jan 2022 10:49 AM (IST)

  नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट

  - नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट - गेल्या 24 तासात फक्त 957 रुग्ण पॉझिटिव्ह - हजारांच्या पट्टीत दिवसागणिक येणारी रुग्ण संख्या घटल्याने आरोग्य विभागाला दिलासा

 • 31 Jan 2022 10:47 AM (IST)

  कोरोनाची तिसरी लाट मुंबईसह महाराष्ट्रात पूर्णपणे ओसरायला सुरुवात:  डॉ. प्रदीप आवटे

  कोरोनाची तिसरी लाट मुंबईसह महाराष्ट्रात पूर्णपणे ओसरायला सुरुवात:  डॉ. प्रदीप आवटे

  10 दिवसात लाट पुर्णपण ओसरणार

  राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांची माहिती

  कोरोनामुळं 21 आजारांपासून संरक्षण मिळतं हा अर्थ चुकीचा

  मानवी जीवनात लसीकरणामुळं इतर आजार टाळता येतात, त्याच आजारावरची लस घेतली तर तो टाळता येतो असा त्याचा अर्थ आहे

  कोरोनाची लस घेतली तर इतर आजार टाळता येत नाही कारण कोरोनाची लस ही कोरोनासाठीचं बनली आहे

  लोकांनी गैरसमज करून घेऊ नये , कोरोनाची लस इतर आजारांपासून संरक्षण देत नाही

 • 31 Jan 2022 09:07 AM (IST)

  देशात 2 लाख 9918 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

  भारतात रविवारी 2 लाख 9 हजार 918 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी मृतांची संख्या 959 वर पोहोचल्यामुळे चिंता वाढलीय. गेल्या 24 तासात 2 लाख 62 हजार 628 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा देशाचा पॉझिटिव्हीटी रेट 15.77 टक्के वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या 18 लाख 31 हजार 268 सक्रिय रुग्ण आहेत.

 • 31 Jan 2022 07:26 AM (IST)

  नागपुरात गर्भवती महिलांभोवती कोरोनाचा विळखा

  - नागपुरात गर्भवती महिलांभोवती कोरोनाचा विळखा

  - नागपूर जिल्हयात 29 दिवसांत 270 गर्भवती महिलांना कोरोनाची लागण

  - तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 8.61 टक्के गर्भवती महिला कोरोना पॅाझीटीव्ह

 • 31 Jan 2022 07:24 AM (IST)

  मुंबई ठाण्यात कोरोना रुग्ण घटले, इतर जिल्ह्यातील संख्या चिंताजनक

  मुंबई, ठाण्यातील करोना रुग्णसंख्या वेगाने कमी होत असली तरी अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र प्रादुर्भाव वेगाने होत आहे.

  गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात मृतांच्या संख्येतही सुमारे दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

  रुग्णांची संख्या आणि बाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असले तरी मुंबई, ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाची तिसरी लाट शिखरावर असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

 • 31 Jan 2022 07:22 AM (IST)

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील तुरुंगामधील 291 कैद्यांना कोरोनाची लागण

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राज्यातील तुरुंगामधील 291 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

  त्यासोबत 57 तुरुंग कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये तुरुंगातील करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

  न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तुरुंगात आलेल्या कैद्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे.

 • 31 Jan 2022 06:28 AM (IST)

  राज्यात 22 हजार 444 नवे कोरोना रुग्ण

  रविवारी राज्यात 22 हजार 444 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 50 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 39 हजार 15 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 27 हजार 711 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

Published On - Jan 31,2022 6:05 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI