कोरोनामुळे पालकांचं छत्र हरवलेली मुलं, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात

नवी मुंबई महापालिकेनंही अशा मुलांसाठी आणि पती गमावलेल्या महिलांसाठी मदतीचा हात देऊ केलाय. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

कोरोनामुळे पालकांचं छत्र हरवलेली मुलं, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा मदतीचा हात
नवी मुंबई महापालिका

नवी मुंबई : कोरोनाच्या संकटात अनेक लहानग्यांच्या डोक्यावर छत्र हरपलं. अनेक मुलं अनाथ झाली. अनेल महिलांनी पती गमावल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. अशावेळी कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी आणि विधवा महिलांसाठी नवी मुंबई महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महापालिकेनं सामाजिक विकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनातून या योजना राबवण्यात येणार आहेत. (welfare schemes of Navi Mumbai Municipal Corporation for children orphaned by Corona)

कोरोनामुळे पालक गमावलेल्या लहान मुलांसाठी राज्य सरकारनेही मदतीचा हात दिला आहे. स्थानिक पातळीवर काही महापालिकांनीही कोरोनामुळे अनाथ जालेल्या मुलांसाठी आपल्या स्तरावर काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. अशाचप्रकारे आता नवी मुंबई महापालिकेनंही अशा मुलांसाठी आणि पती गमावलेल्या महिलांसाठी मदतीचा हात देऊ केलाय. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

राज्य सरकारची 5 लाखांची मुदत ठेव योजना

राज्य सरकारकडून कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने 2 जून रोजी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे राज्य सरकारकडून 5 लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येणार आहे. या मुलांना ही मदत 21 व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अनाथ झालेल्या मुलांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्या कोरोनामुळे 5 हजार 172 मुलांनी आई-वडिलांपैकी एकाला गमावलं आहे. तर 162 मुलांचे आई आणि वडिल अशा दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मुलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. या ही मुलं 21 वर्षांची झाल्यावर त्यांना व्याजासह ही रक्कम मिळेल. त्यामुळे शिक्षण आणि उद्योग-व्यवसायासाठी या मुलांना थोडी आर्थिक मदत मिळेल.

12वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनातर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या मुलांनी त्यांच्या दोन्ही पालकांना गमावलं आहे त्यांच्या पहिली ते बारावीच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आग्रही आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये: सुप्रिया सुळे

welfare schemes of Navi Mumbai Municipal Corporation for children orphaned by Corona

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI