Maharashtra omicron update : कोरोना रुग्णवाढीनं 12 हजाराचाही टप्पा ओलांडला, ओमिक्रॉनचे 68 रुग्ण, आजची आकडेवारी वाचा सविस्तर

Maharashtra omicron update : कोरोना रुग्णवाढीनं 12 हजाराचाही टप्पा ओलांडला, ओमिक्रॉनचे 68 रुग्ण, आजची आकडेवारी वाचा सविस्तर
प्रातिनिधीक फोटो

आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत.

मंजिरी धर्माधिकारी

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 03, 2022 | 8:53 PM

एकिकडे कोरोना तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा कहर सुरूच आहे, राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे.

मुंबईत आजही 8 हजार कोरोना रुग्ण

मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे, मुंबईत पुन्हा 8000पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या चोवीस तासात मुंबईत तब्बल 8 हजरा 82 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता आणखी वाढली आहे. काल मुंबईत (Mumbai) 8 हजार 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईवरील कोरोनचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. तर शनिवारी मुंबईत 6 हजार 347 रुग्ण आढळून आले होते, गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने धाकधूक वाढली आहे.

शाळेतला कल्लोळ पुन्हा बंद

नवी मुंबईतील शाळाही 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई पाठोपाठ नवी मुंबई पालिकेनंही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात येत असून शाळा पुन्हा ऑनलाईन सुरु राहणार आहेत. दरम्यान, दहावी बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. सगळ्यात मुंबई महानगरपालिकेनं शाळांबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ठाण्यातही शाळांबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच नवी मुंबईतही शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईतील 500 चौ. फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार, सिडकोने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची एकनाथ शिंदेंची सूचना

मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही निर्णय! पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार, 10वी, 12वीचं काय?

Mumbai corona update : कहर सुरुच! मुंबईत पुन्हा 8000 पेक्षा जास्त रुग्णांची भर, आजची रुग्णवाढ किती? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें