AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 28 लाखांची दंडवसुली

दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. | Coronavirus spitting in Mumbai

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून 28 लाखांची दंडवसुली
mumbai municiple corporation
| Updated on: Jun 01, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सुविधा देणारी महानगरपालिका आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील नियमितपणे घेत असते. या अंतर्गत आरोग्य सुविधा देण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंबही सातत्याने करण्यात येतो. (Fine for spitting at public places in Mumbai)

याच अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे कोरोना, क्षयरोग यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर महापालिकेद्वारे रुपये 200/- एवढा दंड सध्या आकारण्यात येत आहे. मात्र, ही रक्कम गेल्या अनेक वर्षांपासून रुपये 200/- इतकीच असल्याने या रकमेत वाढ करण्याची बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

या अनुषंगाने ही दंड रक्कम वाढविण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)  सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आवश्यक ती पुढील कार्यवाही महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त संजोग कबरे यांनी दिली आहे.

28 लाखांचा दंडवसुली

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई नियमितपणे करण्यात येते. या कारवाई अंतर्गत गेल्या सुमारे सात महिन्यात 14 हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्ल तब्बल रुपये 28 लाख 67 हजार 900 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888मधील कलम 461 अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – 2006’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते.

याच उपविधीतील क्रमांक 4.5नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंकडून रुपये 200/- इतकी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे 6 महिन्यांच्या कालावधीत रुपये 28 लाख 67हजार 900इतकी दंड वसुली करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्वाधिक दंड वसुली ही प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश असलेल्या ‘एल’ विभागातून करण्यात आली असून, ती रुपये 04 लाख 70 हजार 200इतकी आहे. या खालोखाल ‘ए’ विभागातून रुपये 3 लाख 29 हजार 800, तर ‘सी’ विभागातून रुपये 2 लाख 71 हजार 400 इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवाद

(Fine for spitting at public places in Mumbai)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....