AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्यानाश! रत्नागिरीत कोरोना पेशंटने फोन उचलला नाही, लग्नमंडपात बिनधास्त फिरला

या साऱ्या प्रकारामुळे आता सरकारी यंत्रणांनी अशा नागरिकांचे करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. | Coronavirus Ratnagiri

सत्यानाश! रत्नागिरीत कोरोना पेशंटने फोन उचलला नाही, लग्नमंडपात बिनधास्त फिरला
विशेष म्हणजे या कोरोना रुग्णाला स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून फोन केले जात होते. मात्र, हा व्यक्ती फोन उचलत नव्हता.
| Updated on: Feb 22, 2021 | 9:04 AM
Share

रत्नागिरी: राज्यातील कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असताना अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करत आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात एका महाभागाने यापुढे जात निष्काळजीपणाचा अक्षरश: कळस गाठला. संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असूनही एका लग्नाला उपस्थित होती. त्यामुळे सध्या रत्नागिरीत एकच मोठी खळबळ उडाली आहे. (Coronavirus patient in wedding ceremony at Ratnagiri)

या व्यक्तीला काही दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी करुनही घेतली होती. मात्र, इतके असूनही हा व्यक्ती लग्नाला गेला. विशेष म्हणजे या कोरोना रुग्णाला स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून फोन केले जात होते. या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, हा व्यक्ती फोन उचलत नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित व्यक्तीच्या घरी येऊन धडकले. तेव्हा हा व्यक्ती एका गावात लग्नासाठी गेल्याचे समजते.  अखेर आरोग्य यंत्रणेने सरपंच आणि पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी फोन करुन या व्यक्तीला लग्नमंडपातून बाहेर काढायला लावले. या साऱ्या प्रकारामुळे आता सरकारी यंत्रणांनी अशा नागरिकांचे करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रत्नागिरीत गेल्या 24 तासांत 27 नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 27 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महाविद्यालयातील 7 शिक्षकांचा समावेश आहे. तर संगमेश्वर आणि दापोलीतील दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 362 वर जाऊन पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले

राज्यात गेल्या 24 तासांत 6971 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासांत 2417 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत एकूण 21,00,884 रुग्ण सापडले असून, आतापर्यंत 51788 रुग्णांचा मृत्यू झालाय. तसेच राज्यात आतापर्यंत 19,94,947 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, सध्या राज्यात 52,956 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागानं दिली आहे

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद, वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा रद्द

राजापूर आणि लांजा शिवसेना शाखांनी राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कोकण दौरा आयोजित केला गेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सरदेसाई यांचा दौरा रद्द करण्यात आला.

राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द

युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचे राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लांजा आणि राजापूरमध्ये शिवसेनेच्या युवा कार्यकत्यांशी संवाद वरुण देसाई संवाद साधणार होतेृ. तसंच वरुण सरदेसाई यांच्याबरोबर युवा सेनेचे काही पदाधिकारी देखील कोकण दौऱ्यावर होते. यावेळी सेनेने राजकीय मेळाव्याचं देखील आयोजन केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सेनेने सगळे कार्यक्रम रद्द केल्याची घोषणा केली आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

महाराष्ट्रात लॉकडाऊन लावायचा का? मुख्यमंत्र्यांचं जनतेला 8 दिवसांचं अल्टीमेटम

लग्नाची वरात, कोव्हिड हॉस्पिटलच्या दारात, नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह, वऱ्हाडी क्वारन्टाईन!

(Coronavirus patient in wedding ceremony at Ratnagiri)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.