Deepali chavan: आरोपी शिवकुमारची पोलीस कोठडीत बडदास्त, डोक्यावर पंखा, खायला मटण

डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांची आत्महत्या | Deepali chavan Suicide case

Deepali chavan: आरोपी शिवकुमारची पोलीस कोठडीत बडदास्त, डोक्यावर पंखा, खायला मटण
पोलिसांकडून शिवकुमारला व्हीआयपी ट्रीटमेंट

अमरावती: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांना आत्महत्या करायला भाग पाडणारा आरोपी विनोद शिवकुमार याला पोलीस कोठडीत खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याला देण्यात आलेल्या या व्हीआयपी ट्रीटमेंटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवकुमारला त्याच्या कोठडीत एक पंखा लावून देण्यात आला आहे. याशिवाय, त्याला दररोज जेवणासाठी मटनाचा डबाही पुरवला जात आहे. अमरावतीमधील भाजप नेते शिवराय कुलकर्णी यांनी हा आरोप केला आहे. (Forest Officer Deepali Chavan’s suicide case DFO Shivkumar in police custody)

त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शिवकुमारला न्यायालयात आणले तेव्हा संतप्त महिलांनी त्याला गराडा घातला होता. शिवकुमारला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी या महिलांनी केली होती.

डीएफओ विनोद शिवकुमारला नागपुरात बेड्या

डीएफओ विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून दीपाली यांनी आत्महत्या केल्याने धारणी पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यानंतर शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यात धडक दिली होती. आरोपी शिवकुमारला ताब्यात देण्याची मागणी महिलांनी केली.

आरोपीला कोर्टात नेत असताना महिला मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्या होत्या. शिवकुमारचा निषेध व्यक्त करत महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसंच त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचीही मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी मानवी साखळी करुन आरोपीला कोर्टात हजर करावं लागलं.

शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

दरम्यान दीपाली चव्हाण यांच्या आईने आरोपी शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. विनोद शिवकुमार याचं निलंबन करुन श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

दीपाली चव्हाण यांची सुसाईड नोट

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.

संबंधित बातम्या :

नवरोबा, आपण बाळाला गमावलं, तू पुन्हा लग्न कर, पण नोकरीवाली बायको नको, दीपाली चव्हाणचं पतीला पत्र, जसंच्या तसं

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

(Forest Officer Deepali Chavan’s suicide case DFO Shivkumar in police custody)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI