AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर सत्ता सोडाल का?… अजितदादांना प्रश्न विचारताच काय म्हणाले?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याच्या नजरा लागल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. त्यामध्येच अजित पवार यांनी अनेक मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले.

तर सत्ता सोडाल का?... अजितदादांना प्रश्न विचारताच काय म्हणाले?
Deputy Chief Minister Ajit Pawar
| Updated on: Jan 08, 2026 | 1:15 PM
Share

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून राजकीय वातावरण बघायला मिळतंय. यादरम्यानच्या काळात आरोप प्रत्यारोपाचे सत्र रंगले आहे. राज्यभरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गट आणि शरद पवार गट वेगळे लढत असून याला फक्त पिंपरी चिंचवड महापालिका अपवाद आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढताना दिसत आहेत. हेच नाही तर या महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवारांवर फार काही टिकाही केली जात नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी tv9 मराठीला एक मुलाखत दिली असून त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे यादरम्यान दिली आहेत. आमच्या युतीत सात ते आठ पक्ष असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

टीव्ही9 मराठीच्या अँकर निखिला म्हात्रे यांनी वैचारिक दबाव वाढला तर सत्ता सोडाल का? हा प्रश्न अजित पवारांना विचारला असता. अजित पवारांनी म्हटले की, कशा करता वैचारिक दबाव वाढेल आणि काय होईल. आमचं आमचं बरं चाललंय. तुम्ही का दृष्ट लावता आम्हाला. महापाैरपदाबद्दल बोलताना अजित पवारांनी म्हटले की, याबाबत पुणे आणि पिंपरीचिंचवडकर कौल देतील.

आम्हाला दोन्ही ठिकाणी बहुमत देतील. आमचा विजय होईल. आमचा महापौर होईल. दोन्ही शहरं आमच्या हातात सूत्र देतील. आमचाच महापौर होणार आहे. कामच करून दाखवणार आहे. मी काम करून दाखवलंय ना. पिंपरीत काय केलं ते पाहा. बेस्ट सीटी म्हणून मनमोहन सिंग यांनी आम्हाला पुरस्कार दिला होता. 10 वर्ष पूर्ण पुणे माझ्यासोबत नव्हतं. काहींची मदत घ्यावी लागली. पण आम्ही काम करू.

युतीबद्दल बोलतान अजित पवार यांनी म्हटले की, आम्ही बसून त्यावर चर्चा करू. कारण नसताना चुकीचा अर्थ काढू नका. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याने कॉन्फिडन्स वाढला असं नाही. आम्ही त्या अँगलने विचारच केला नाही. विचारच केला नाही तर त्या अँगलने विचार का करायचा. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होती. एकमेकांविरोधात लढायचो. केडीएमसी आणि इतर निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जबडा वगैरे बोलायचे, असेही अजित पवारांनी म्हटले.

बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका.
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला
अजित पवार आणि भाजपची युती म्हणजे नुराकुस्ती! उद्धव ठाकरेंचा टोला.
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
राजकर्त्यांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान.
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला खड्ड्यात घातलं पाहिजे! उद्धव ठाकरेंचा घणाघात.
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत
भाजप करत असलेलं राजकारण दुर्दैवी! राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत.
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप
मिंधेचा वापर करून ते...; उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप.
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....