मुंबई महापालिकेच्या 20 हजाराच्या ठेवी गेल्या कुठे? उद्धव ठाकरे यांच्या सवालाला एकनाथ शिंदे यांचं थेट उत्तर; म्हणाले…
राज्यातील महापालिका निवडणुका तोंडावर असताना प्रचंड आरोप राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. त्यामध्येच आज भाजपा आणि शिवसेनेने मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

राज्यातील महापालिका निवडणुकीचे 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आहे. त्यापूर्वी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मुंबई महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काही दिवसांपूर्वीच शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करत गंभीर आरोप भाजपावर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज एकत्र येत मुंबई महापालिकेचा युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपा, मनसे, ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यात मुंबई महापालिकेत प्रमुख लढत बघायला मिळतंय. मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांकडून दावा केला जातो. उद्धव ठाकरे यांनी tv9 मराठीला एका मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी दावा केला की, 20 हजारांच्या ठेवी खाऊन टाकल्या.
नुकताच युतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदे हे दिसले. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, 20 हजार 166 कोटी वर्षाला खर्च करून. 80 हजार 115 कोटी ठेवी आहेत. एवढा खर्च करून ठेवी आहेत. त्यांच्या काळात पाच हजार कोटी ठेवी होत्या. मी त्यांची जाहिरात पाहिली. त्यात हे करून दाखवलं, ते करून दाखवलं असं लिहिलं आहेत.
त्यांनी खिचडीत भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी नदीत गाळ खाल्ला, रस्त्याच्या कामात पैसे खाल्ले हे पण त्यांनी त्यात टाकायला पाहिजे होतं. काम तर करत नव्हते. कामचोर म्हणायचे त्यांना. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आरोग्याचे उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवायचे आहेत. ते राबवू. कल्याणकारी योजना राबवू. बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते या उपक्रमात असेल.
त्यांचाही वचननामा पाहिला. त्यात बाळासाहेबांचा उल्लेखही नाही साधा. त्यांचा टोमणे नामा, हलफ नामा आहे. काय म्हणायचे ते म्हणा. आमचा वचननामा आहे. त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम आहे. ते निवडणुकीतच दिसतं. आम्ही मराठी नाटकांसाठीचे नाट्यगृह उभारू, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
