Uddhav Thackeray: शिवसेनेमुळे तुम्हाला सत्ता मिळाली तुम्ही काय खान होता का? उद्धव ठाकरे कडाडले
Uddhav Thackeray on BJP: उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीतून अनेक मुद्दे समोर आले. त्यावर त्यांनी ठाकरे शैलीत फटकारे मारले. अनेक वेळा त्यांचा ठाकरी बाणा समोर आला. टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यातील हळवा कोपराही समोर आला.

Uddhav Thackeray on BJP: विधानसभा निवडणुकीत खाण हवा की बाण असा जोरात प्रचार झाला होता. उद्धव ठाकरे यांच्यावर मुस्लिम मतांसाठी लांगुलचालनाचा आरोपही करण्यात आला होता. आताही भाजपच्या प्रचाराचा रोख तसाच आहे. या मुद्दावर उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलंच खंडीत पकडलं. टीव्ही ९ मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली.उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीतून अनेक मुद्दे समोर आले. तर त्यांचा ठाकरी बाणाही दिसला. मुलाखतीच्या अखेरीस उद्धव ठाकरे यांचा हळवा कोपराही दिसला.
मग हे खान आहेत का सगळे?
मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपला मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांचा रोख अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या खाण आणि बाण या वक्तव्याचा समाचार घेतला. तुम्हाला मंत्रालयापर्यंत आणलं. नाही तर आज हे मंत्रालयात दिसले नाही. शिवसेनेमुळे यांना सत्ता मिळाली हे खान आहेत का सगळे. शिवसेना नसती तर हे सत्तेत आले असते का, असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मुलाखतीदरम्यान त्यांनी एक लाख रुपयांचं भाजपला चॅलेंज देतो. मुंबईचा महापौर कोण होणार, सुरुवात कोणी केली. आम्ही तर खान महापौर होणार असं म्हटलं नाही. यांचं एक भाषण दाखवा की हिंदू मुस्लिम केलं नाही. लोकांची घरे जाळून पोळ्या शेकणारे हे नालायक लोक आहे. बाळासाहेबांचा जन्म पुण्याचा असला तरी त्यांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही. गिरणी कामगारांच्या लढ्यात साहेब होते. तुम्हाला मंत्रालयापर्यंत आणलं. नाही तर आज हे मंत्रालयात दिसले नाही. शिवसेनेमुळे यांना सत्ता मिळाली हे खान आहेत का सगळे. शिवसेना नसती तर हे सत्तेत आले असते का, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. ठाकरेंचा शब्द आहे.आता मोदींची गॅरंटी चालत नाही, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.
हे मुंबई लुटतायेत
यावेळी मुंबईतील ठेवीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. ठेवी चाटायला नसतात. कंत्राटदारांना द्यायला नसतात, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. बेस्ट कर्मचारी, बीएमसी कर्मचाऱ्यांचा फंड, ग्रॅच्युएटी, धरण, सोयी सुविधांसाठी हा या ठेवी असतात. आवक आणि जावकचा ताळमेळ घालावा लागतो. ऑक्ट्रॉय मारला. जीएसटी वर गेला. डायमंड मार्केट हे गुजरातला गेलं. महाराजांनी सुरत लुटली होती. स्वराज्यासाठी लुटली होती. हे मुंबई लुटत आहेत. इंग्रजांपेक्षा भयानक पद्धतीने मुंबई लुटत आहे. मुंबईच्या सर्व गोष्टी बाहेर नेऊन मुंबईला भिकारी करत आहेत, असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी भाजपवर केला.
