ट्रिप प्लॅन करताय? मग सेवाग्रामचा आश्रम तुमच्या प्रतिक्षेत, एकदा बघा आणि ठरवा

फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आधी महात्मा गांधी याचे विचार आणि त्यांच्या आठवणी जपणाऱ्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला नक्की भेट द्या. (Sevagram Ashram Wardha)

ट्रिप प्लॅन करताय? मग सेवाग्रामचा आश्रम तुमच्या प्रतिक्षेत, एकदा बघा आणि ठरवा

वर्धा : थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या परिवारासोबत किंवा मित्रमंडळींसोबत फिरायला जाण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. आपणही असा काही विचार करत असाल तर आधी महात्मा गांधी याचे विचार आणि त्यांच्या आठवणी जपणाऱ्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला नक्की भेट द्या. हे ठिकाण आजही गांधीजींच्या आठवणींना उजाळा देते. (detail information of tourist spot Sevagram Ashram Wardha)

महात्मा गांधी यांचे वर्धा जिल्ह्यात आगमन

मानसपुत्र जमनालाल बजाज यांच्या आग्रहावरून महात्मा गांधी वर्धा जिल्ह्यात आले. सुरुवातीला ते सेवाग्राम मार्गावर असलेल्या महिला आश्रमात राहिले. ( पूर्वी हा आश्रम सत्याग्रही आश्रम म्हणून ओळखला जायचा) जानेवारी 1935 मध्ये ते मगनवाडीत येथे राहण्यासाठी गेले. याच काळात मिस स्लेड उर्फ मीरा बेन यांना बापूंनी शांत जागेची निवड करण्याची जवाबदारी दिली होती. मीरा बेन यांनीच आश्रमासाठी सेवाग्रामची निवड केल्याचे सांगितले जाते. 30 एप्रिल 1936 मध्ये महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमात आले. यापूर्वी ते 17 एप्रिलला सेवाग्राम म्हणजे सेगावमधील लोकांना भेटले. सुरुवातीला राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ते सध्याचे ‘आद्य आदी निवास’ म्हणजे तत्कालीन पेरुची बाग आणि एक विहीर जवळ असलेल्या झोडपीत राहिले. महात्मा गांधी साधरण पाच दिवस या ठिकाणी राहिले.

आदी निवास

त्यांनतर महात्मा गांधी यांनी जमनालाल बजाज यांना एक कुटी बांधण्यास संगीतले. ही कुटी सामान्य माणसाची असते, तशीच असावी असे त्यांनी सांगितले. ही कुटी तयार करण्यासाठी 100 रुपयांपेक्षा जास्त खर्च लागू नये, असेही गांधीजी यांनी जमनलाल बजाज यांना सांगितले. त्यांनतर ते 5 मे 1936 ला खादी यात्रेकरीता निघून गेले. 16 जूनला 1936 मध्ये परत येईपर्यंत गांधी यांना राहण्यासाठी झोपडी तयार करण्यात आली होती. या झोपडीला आदी नीवास म्हटले जाते. गांधी यांच्या मृत्यूनंतर या झोपडीला आदिनीवास असे नाव देण्यात आले. महात्मा गांधी यांच्या स्मृती या ठिकाणी आजही ताज्या आहेत. त्यामुळे या ठिकणी भेट दिल्यांतनर आदी निवास नक्की पाहावे.

बापू कुटी

1937 च्या शेवटच्या काळात मिस स्लेड म्हणजेच मिराबेन राहत असलेल्या कुटीत बापू राहायला गेले. या कुटीला बापू कुटी म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला लहान असलेली ही कुटी बापू राहायला गेल्यानंतर मोठी करण्यात आली. यात स्नानगृह औषधोपचार करणारे केंद्र बांधण्यात आले. या ठिकाणी अनेक बैठका व्हायच्या. याच ठिकाणी अनेक लोक बापुंना भेटत.

बा कुटी

जमनलाल बजाज हे कस्तुरबा गांधी म्हणजे बा ला आईचा स्थानी मानायचे. कस्तुरबा गांधी ज्या ठिकाणी राहायच्या त्या रस्त्यावरुन अनेक जण येजा करत. त्यामुळे कस्तुरबा गांधी यांना अडचण होत असल्यामुळे जमनलाल यांनी कस्तुरबा यांच्यासाठी बा कुटी तयार करून दिली. कालांतराने इतर महिला आल्यानंतर त्या बा सोबत याच कुटीत राहायचा.

आखरी निवास

आखरी निवास येथे असलेली कुटी ही बा कुटीच्या जवळच जमनालाल बजाज यांनी स्वतःसाठी बांधून घेतली होती. मात्र, ते या ठिकाणी राहू शकले नाही. बापूचे मुख्य सचीव महादेवभाई हे इथे सहकुटुंब राहिले. तसेच सुशीला नायर यांनी याच झोपडीत रोग्यांवर उपचार केले. आज सेवाग्राम येथे असलेल्या कस्तुरबा हेल्थ सोसायटी या भव्य दवाखान्याची सुरुवात याच कुटीतून झाली असे म्हणायला हरकत नाही.

राहण्याची उत्तम व्यवस्था

या ठिकणी भेट द्यायची असल्यास राहण्याची काय व्यवस्था आहे, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र, या आश्रमाच्या परिसरात तसेच समोरील बाजूस यात्री निवास बनविण्यात आले आहे. सुरवातीला साधेसे असलेले यात्री निवास आता अत्याधुनिक झाले आहे. येथे आलेल्या पर्यटकांच्या निवासाची या ठिकाणी उत्तम व्यवस्था आहे.

जेवणाची उत्तम सुविधा

या ठिकाणी पर्यटकांसाठी जेवण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. आश्रमासमोरच प्राकृतिक आहार केंद्र आहे. यात आश्रम परिसरात असलेल्या शेतीत उत्पादित झालेल्या सामानापासून जेवण तयार करण्यात येते. या ठिकाणी पर्यटक जेवण करु शकतात. तसेच यात्री निवासातही जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संबंधित बातम्या :

स्वस्तात मस्त, थंडीच्या सुट्टीसाठी भारतातील ‘या’ 5 राज्यांना नक्की भेट द्या!

Holiday Calendar 2021 | नव्या वर्षात सुट्ट्यांची रांग, पाहा कधी आणि किती दिवस ‘हॉलिडे’

(detail information of tourist spot Sevagram Ashram Wardha)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI