Holiday Calendar 2021 | नव्या वर्षात सुट्ट्यांची रांग, पाहा कधी आणि किती दिवस ‘हॉलिडे’

काही दिवसांतच 2020 हे वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2020मध्ये कोरोना विषाणूमुळे, बहुतेक लोक घरातच अडकून पडले आहेत. म्हणूनच 2021 या वर्षाकडे लोक खूप आशेने पहात आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:00 PM, 4 Dec 2020
काही दिवसांतच 2020 हे वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2020मध्ये कोरोना विषाणूमुळे, बहुतेक लोक घरातच अडकून पडले आहेत. म्हणूनच 2021 या वर्षाकडे लोक खूप आशेने पहात आहेत. लोक नवीन वर्षाच्या सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेणेकरून ते फिरण्याच्या योजना आखू शकतील. चला तर, 2021च्या सुट्टीच्या कॅलेंडरवर एक नजर टाकूया..
जानेवारी, फेब्रुवारी, मार्चची सुट्टी : जानेवारी महिन्यात सहजा फक्त प्रजासत्ताक दिनाची एकच सुट्टी असते. मात्र, 2021मध्ये 26 जानेवारी हा दिवस मंगळवारी येत आहे. म्हणून शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांना सोमवारची सुट्टी घेऊन 4 दिवसांच्या छोट्या ट्रीपची योजना आखता येणार आहे. यावर्षी फेब्रुवारीत एकही सुट्टी नाही. तर, मार्च महिन्यात 2 सुट्ट्या आहेत. 11 मार्च, गुरुवारी महाशिवरात्री, तर रविवार, 28 मार्चला होळी आहे.
एप्रिल, मे आणि जून : 2021मध्ये एप्रिल महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. 2 एप्रिलला गुड फ्रायडे, 14 एप्रिलला आंबेडकर जयंती आणि 21 एप्रिलला राम नवमीची सुट्टी असणार आहे. मे महिन्यात, 12 मे रोजी ईद-उल-फितरची सुट्टी आहे, तर 26 मे रोजी बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. मात्र, जून महिन्यात एकाही सुट्टी नाही.
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर : 2021 जुलै महिन्यात फक्त एक सुट्टी आहे. बुधवारी, 21 जुलै रोजी ईद-उल जुहाची (बकरी ईद) सुट्टी असणार आहे. आपण सगळेच,15 ऑगस्टच्या सुट्टीला मुकणार आहोत. कारण, 15 ऑगस्ट हा रविवार असणार आहे. 19 ऑगस्ट रोजी शुक्रवारी मुहर्रमची सुट्टी असणार आहे. यावेळी तुम्ही तीन दिवसांच्या शॉर्ट ट्रीपवर जाण्याची योजना आखू शकता. यावर्षी, जन्माष्टमी उत्सव सोमवारी, 30 ऑगस्टला आहे. तर, सप्टेंबरमध्ये एकही सुट्टी नाही.
ऑक्टोबर महिन्याची सुट्टी : 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. गुरुवारी, 7 ऑक्टोबर रोजी अग्रसेन जयंती आहे. शुक्रवार, 15 ऑक्टोबर रोजी दसरा हा सण आहे. या आठवड्यातही आपण तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारच्या दिवशी ईद-ए-मिलाद आहे, तर 20 ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मीकि जयंती बुधवारी आली आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर : 2021मधे दिवाळीचा सण गुरुवारी, 4 नोव्हेंबरला साजरा होणार आहे. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस ट्रीपची योजना आखू शकता. 2021मध्ये 25 डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी शनिवार आल्याने ही सुट्टी कमी होणार आहे.