शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती. स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा आरोप शिवेससेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावले, असा खळबळजनक आरोपही राऊत यांनी केला

शिवसेनेचे आमदार फोडण्यासाठी फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 12:27 PM

भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा डाव होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला. भाजपाचे आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचं कारस्थान महाविकास आघाडीने रचलं होतं, असा गौप्यस्फोट मविआमधील तत्कालीन मंत्री असणाऱ्या आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता मविआ नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. ‘ फोन टॅपिंग प्रकरणी आता आपल्यला अटक होऊन शिक्षा होईल अशी भीती देवेंद्र फडणवीस यांना वाटत होती. त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव आणून आमदार फोडायला लावले आणि मविआ सरकार पाडलं’ असा असा गौप्यस्फोट केला. स्वत:ची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले असा आरोपही राऊत यांनी केला.

आज सकाळी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी फडणवीस, तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.शिंदेंच्या आरोपांना संजय राऊत यांनी चोख प्रत्युतर दिलं. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची योजना आखली होती, असे आता मुख्यमंत्री ( एकनाथ शिंदे) म्हणत आहेत. पण मुळात शिंदेंच्या डोक्यात हे कुठून आलं ? कारण या लोकांनी काहीतरी केलं असेल ना… विनाकारण कोणी कोणाला का अटक करेल ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. अत्यंत बेकायदेशीरपणे, चोरून त्यांनी विरोधकांचे फोन ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या त्यापैकी एक होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरून विरोधी पक्षातील दोन नेत्यांवर पाळत ठेवण्यात आली.

त्यांच्या या आरोपांना संजय राऊत यांनी चोख प्रत्युतर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता. अत्यंत बेकायदेशीरपणे, चोरून त्यांनी विरोधकांचे फोन ऐकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या हुकूमावरून विरोधकांवर पाळत ठेवण्यात आली. त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती, गुन्हे दाखल झाले.

स्वत:ची अटक टाळण्यासाठी पक्ष फोडले

त्या प्रकरणाचा तपास, चौकशी सुरू होती, गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होऊन शिक्षा होईल, अशी भीती फडणवीस यांना वाटत होती. मनातील या भीतीमुळे फडणवीस तडतड करू लागले.  या भयातून नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंवर दबाव निर्माण केला. ते एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्ही शिवसेनेचे आमदार फोडा आणि आमच्याबरोबर या,  नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू. त्यांनी शिंदेंना अटकेची भीती दाखवली. स्वत:ची अटक टाळण्यासाठी, बचाव करण्यासाठी त्यांनी पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आमचं सरकार आल्यावर पुन्हा चौकशी सुरू

केंद्रातलं सरकार 100% बदलतंय. तुम्ही सत्तेत आल्यावर गुन्हे रद्द केले, चौकश्या रद्द केल्या. आम्ही सत्तेवर आल्यावर पुन्हा एकदा त्या चौकशा पुन्हा सुरू करू, असा इशाराही संजय राऊत यांनी फडवणीस आणि शिंदे यांना दिला.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.