AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वाघनखांमधून आता कुणाचा कोथडा काढायचा नाही, पण मुख्यमंत्री त्या लोकांच्या….’, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

"छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विनंती केली की, या वाघनखांवरुन विवाद करु नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे की, उठसूट प्रत्येक गोष्टीत काहीना काही विवाद निर्माण करायचा", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

'वाघनखांमधून आता कुणाचा कोथडा काढायचा नाही, पण मुख्यमंत्री त्या लोकांच्या....', देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jul 19, 2024 | 6:00 PM
Share

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला ते वाघनख आज इंग्लंडच्या म्युझियम येथून साताऱ्यात आली आहे. साताऱ्यात वस्तू संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. या वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्या उद्घाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. संबंधित वाघनखे हे शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला.

“आपल्या सर्वांकरता आजचा क्षण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांचा उपयोग करत स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या अफजल खानाचा वध केला होता, तो चित्त थरारक प्रसंग पिढ्यांपिढ्या आपण सगळे ऐकत आलो. त्याच प्रसंगांमधील जे प्रमुख शस्त्र होतं ती वाघनखं जी अनेक वर्ष लंडनच्या म्युझियममध्ये होती ती आपल्या भारतात या ठिकाणी आली आणि खऱ्या अर्थाने आमची राजधानी असलेल्या साताऱ्यात वस्तू संग्रहालयात आपल्या सर्व भारतीयांना आणि शिवप्रेमींना दर्शनासाठी उपलब्ध झाली, मला असं वाटतं, यापेक्षा मोठं भाग्य असू शकत नाही”, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

“छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी विनंती केली की, या वाघनखांवरुन विवाद करु नका. आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे की, उठसूट प्रत्येक गोष्टीत काहीना काही विवाद निर्माण करायचा. हे असंच असेल तर, हे तसंच असेल तर? पण खरं म्हणजे हा रोग आजचा नाहीय. या रोगाचा सामना प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनादेखील करावा लागला होता. स्वराज्यातही काही अशी लोकं होती जे शंका उत्पन्न करायचे, पण त्या सर्व शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य प्रस्थापित करुन दाखवलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मला विश्वास आहे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांनादेखील वाघनखं दिली. आता कुणाचा कोथडा काढायचा नाहीय. पण काहींच्या बु्द्धीवर बुरशी आली आहे. काहींच्या बुद्धीवर जंग चढला आहे. मुख्यमंत्री त्यांची या वाखनखांमधून बुरशी आणि जंग उतरवण्याचं काम निश्चितपणे कराल हा मला विश्वास आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.