AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला? फडणवीसांनी A टू Z सांगितलं; म्हणाले यूपीएच्या काळात…

देशातील अर्थव्यवस्थेची वाढ होत आहे. यूपीएच्या सरकारमध्ये आम्ही लोकांसाठी योजना तयार करू, अनुदानावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवी संधी निर्माण करणार नाही, असे ते धोरण होते. पायाभूत सुविधा करण्यावर आम्ही खर्च करणार नाही, असे यूपीएचे धोरण होते. असे फडणवीस म्हणाले.

गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला? फडणवीसांनी A टू Z सांगितलं; म्हणाले यूपीएच्या काळात...
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2026 | 6:23 PM
Share

Devenrda Fadnavis Speech : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची पुढची दिशा मांडली आहे. मुंबईत आज ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात नेमकं काय काय घडलं? मोदी यांनी नेमका काय विकास केला, याची सविस्तर माहिती दिली. मोदी यांच्या काळात भारताचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. भारताची अर्थव्यवस्था वाढली, असे फडणवीस म्हणाले.

आज भारत आत्मनिर्भर भारत म्हणून स्वाभिमानाने उभे असलेला गेल्या 12 वर्षांत पाहायला मिळत आहे. 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम एका पुस्तकात मांडणे शक्य नाी. मोदी यांच्या कामाबाबत बोलणं भाषणातही कठीण आहे. विविध क्षेत्रात जे परिवर्तन झाले, त्याची ही बारा वर्षे आहेत. या वर्षात आपण सगळ्यात महत्त्वाची वाटचाल ही सामाजिक क्षेत्रात झालेली आहे. गरिबांना गॅस देणे, गरिबांना घर देणे, गरिबांना शौचालय दणे ही कामे झाले. मोदींजींनी गरीब केंद्रीत असा अजेंडा चालवला. दहा वर्षात भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. हे जगाने मान्य केलेले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पंचवीस कोटी लोक गरिबीत होते, ते गरिबी रेषेच्या वर आले. गेल्या दहा वर्षात असे करणे जगातील कोणत्याही देशाल शक्य झाले नाही. ते भारताने मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्याने करून दाखवले. आपण आता पुढेच जाणार आहोत. कारण मोदीजींनी भक्कम पाया रचला आहे. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी 2013 साली 103 लाख कोटी होती. आज तो जीडीपी 357 लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे दहा वर्षात भारताचा जीडीपी तीन पटींनी वाढला, असेही फडणवीस म्हणाले.

देशातील अर्थव्यवस्थेची वाढ होत आहे. यूपीएच्या सरकारमध्ये आम्ही लोकांसाठी योजना तयार करू, अनुदानावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवी संधी निर्माण करणार नाही, असे ते धोरण होते. पायाभूत सुविधा करण्यावर आम्ही खर्च करणार नाही, असे यूपीएचे धोरण होते. अनुदानप्रणित अर्थव्यवस्था त्या काळात तयार झाला. हळूहळू अर्थव्यस्थेवरील ताणामुळे आपण नवी संधी निर्माण करू शकलो नाही, अशी टीका त्यांनी याआधीच्या यूपीए  सरकारवर केली.

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?.

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय