AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर येणार, आजच खातेवाटप आणि मंत्रिमंडळाची बैठक?

महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर येणार, आजच खातेवाटप आणि मंत्रिमंडळाची बैठक?
| Updated on: Dec 05, 2024 | 7:54 AM
Share

Maharashtra CM Swearing-in Ceremony : मी पुन्हा येईन अशी गर्जना देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आजच खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पडणार आहे. यावेळी कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा झाला. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी काल एकत्र राजभवनात दाखल होत सत्तास्थापनेचा दावा केला. आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यानुसार देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शपथविधी सोहळा कुठे?

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला 22 राज्याचे उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तब्बल 40 हजार लोक एकत्र बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण स्टेज आणि मंडप भगव्या रंगाचे असणार आहे.

आझाद मैदानात कोणताही अनुचूत प्रकार घडू नये तसेच शपथविधी समारंभाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता 1500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

शपथविधी सोहळा किती वाजता?

महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी ५.३० वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होईल, असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडेल. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.