AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशाबंदी मंडळाचे तीन वर्षांचे अनुदान प्रलंबित, 54 लाख रुपये तत्काळ वितरीत करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तात्काळ अदा करण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 ऑगस्ट) दिले.

नशाबंदी मंडळाचे तीन वर्षांचे अनुदान प्रलंबित, 54 लाख रुपये तत्काळ वितरीत करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश
DHANANJAY MUNDE
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 8:26 PM
Share

मुंबई : नशाबंदी मंडळ ही शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यरत असलेली एकमेव अनुदानित संस्था आहे. राज्यातील भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी ही संस्था काम करते. त्यामुळे पूर्णवेळ कार्यरत असलेल्या या मंडळाचे 2018 पासूनचे 54 लाख 15 हजार अनुदान तत्काळ अदा करण्यात यावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 ऑगस्ट) दिले. (dhananjay munde grants 54 lakh rupees to Nashabandi Mandal Maharashtra)

याचबरोबर काळाची गरज ओळखून नशाबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात तरूणांचे प्रबोधन अत्यावश्यक असून त्याद्वारे महाराष्ट्राची प्रगती साध्य करता येणार आहे. नशाबंदी मंडळाचे (Nashabandi Mandal Maharashtra) काम आणि राज्याची व्याप्ती पाहता दरवर्षी वितरीत होणाऱ्या अनुदानात वाढ करून ती 30 लाखावरून 60 लाख इतकी करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले.

नशाबंदी मंडळ संस्थेच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक

मंत्रालयात नशाबंदी मंडळ या संस्थेच्या अनुदान व कामकाजा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव दि.रा. डिंगळे आदिसह नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ राजेंद्र वेळुकर, कार्याध्यक्ष आयुक्त आर.के. गायकवाड, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, कार्यकारिणी सदस्य प्रिया पाटील, डॉ. प्रभा तिरमारे, प्रिया पाटील हे उपस्थित होते.

स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद

यावेळी बैठकीदरम्यान बोलताना “नशाबंदी हा संवेदनशील विषय असून, याबाबत तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे. 2020-21 या आर्थिक वर्षातील एकूण देय अनुदानापैकी 14.85 हजार इतके अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आणि व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना तीन कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच व्यसनमुक्ती धोरणाअंतर्गत प्रत्येक महसुली विभागास दोन याप्रमाणे व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या 12 संस्थांना प्रत्येकी 11 लाख अशी एकूण एक कोटी 32 लाख याचबरोबर राष्ट्रीय महात्मा गांधी पुरस्कार व सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीन कोटी रक्कम वितरीत करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या :

Pune Lockdown : पुण्यातील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यास सुरुवात, व्यापारी संतप्त, फतेचंद रांकांनी दुकान सुरुच ठेवलं

Maratha Reservation : 102 व्या घटना दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, आता आरक्षणाचे अधिकार राज्यांना मिळणार

Ravi Kumar Dahiya | फायनलमध्ये एन्ट्री मारताच भारतात जल्लोष, रवीकुमार दहियाचे कुटुंबीय थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ

(dhananjay munde grants 54 lakh rupees to nashabandi mandal maharashtra)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.