AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhangar reservation : सरकारचं शिष्टमंडळ दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीला, उपोषणाचा आज 11 वा दिवस

धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून जालन्यात दिपक बोऱ्हाडे यांचं उपोषण सुरू आहे, आज सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली.

Dhangar reservation : सरकारचं शिष्टमंडळ दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीला, उपोषणाचा आज 11 वा दिवस
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2025 | 6:08 PM
Share

राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी दिपक बोऱ्हाडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचं जालन्यात गेल्या 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे, दरम्यान आज आकराव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली आहे. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच मागणीसाठी आता दिपक बोऱ्हाडे हे जालन्यात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आकरावा दिवस आहे, सरकारच्या शिष्टमंडळानं बोऱ्हाडे यांची भेट घेतली असून, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली  आहे.

दरम्यान यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं की,  दीपक भाऊ यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे, खरं म्हणजे आम्ही लवकर यायला पाहिजे होतं. पण मागील काही दिवसापासून राज्यातील परिस्थिती आपण पाहातात,  पावसाचं खूप मोठं संकट आहे. सगळीकडून आम्हाला फोन येत आहेत, मी जळगाव दौरा आटपून येत असताना मला देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, आता तुम्ही जालन्याला जा असं त्यांनी मला सांगितलं. आमची प्रामाणिक इच्छा आहे, देवा भाऊंनी प्रयत्न केले, मात्र अनेक दिवसापासून र आणि ड चा विषय सुरू आहे. आपल्यावरचा हा अन्याय दूर करायचा आहे आणि तो झालाच पाहिजे. परंतु थोडा वेळ लागत आहे. ही वस्तुस्थिती आहे, असं यावेळी गिरीश महाजन यांनी बोऱ्हाडे यांना म्हटलं.

उपोषण सोडण्याची विनंती 

दरम्यान यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी बोऱ्हाडे यांना उपोषण सोडण्याची देखील विनंती केली आहे. इतकं दिवस उपोषण केलं, आता लांबून चालणार नाही कारण आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटतं की आपण उपोषण सोडलं पाहिजे, माझी आपल्याला विनंती आहे की आपण आता या ठिकाणी उपोषण सोडावं, अशी विनंती महाजन यांनी बोऱ्हाडेंना केली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या