कला केंद्रातील नर्तकी चांगलीच फसली, प्रियकराने जीवन संपवताच… अश्रुबा कांबळे प्रकरणाला धक्कादायक वळण
Ashruba Kambale Death : धाराशीवमधील साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या 25 वर्षीय अश्रुबा अंकुश कांबळे या तरूणाने आत्महत्या केली होती. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

श्रीराम क्षीरसागर, धाराशीव : धाराशीवच्या साई कलाकेंद्रात काम करणाऱ्या एका नर्तकीच्या प्रेमात पडलेल्या एका 25 वर्षीय तरुणाने थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तरुणाचे लग्न झालेले आहे. मात्र तरीही तो कलाकेंद्रात काम करणाऱ्या नर्तकीच्या प्रेमात पडला होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. अश्रुबा अंकुश कांबळे असं या आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. अशातच आता या पकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. अश्रुबा कांबळेच्या आत्महत्येनंतर आता पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नर्तकीवर गुन्हा दाखल
अश्रुबा अंकुश कांबळेच्या आत्महत्येनंतर आता नर्तकी पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे चांगलीच अडचणीत सापडली आहे. तिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येरमाळा पोलिसात कलम 108 बी एम एस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आता सखोल चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात पूजाची अडचण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
धाराशिव जिल्ह्यात साई कला केंद्र आहे. येथे पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे ही महिला नृत्यकाम करते. अश्रूबा अंकुश कांबळे नावाचा 25 वर्षीय तरुण या महिलेच्या प्रेमात होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. अश्रूबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा रहिवासी होता. कला केंद्रात काम करणारी महिला आणि अश्रूबा कांबळे हे 8 डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येते देवदर्शनाला गेले होते. पण परत येताना त्यांच्यात वाद झाला होता. हाच वाद नंतर वाढत गेला आणि यातूनच अश्रूबा या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेमका वाद का झाला?
अश्रूबा आणि कलाकेंद्रात काम करणार नर्तकी शिंगणापूरहून परतत होते. याच वेळी अश्रूबा कांबळे या तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला. त्यानंतर नर्तकी आणि अश्रूबा यांच्यात वाद झाला. हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आता नर्तकी पूजा उर्फ आरती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
