AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khuni Ganpati : मानाच्या या गणरायला का म्हटले जाते ‘खुनी गणपती’, हे नाव का पडले?

Khuni Ganpati: धुळ्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा निर्माण झाल्यानंतर याठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविकांना येतो. धुळ्यात गेल्यावर जुने धुळे भागात ही खुनी मशीद आहे. त्या ठिकाणी बस थांबा खूनी मशिद नावाने आहे.

Khuni Ganpati : मानाच्या या गणरायला का म्हटले जाते 'खुनी गणपती', हे नाव का पडले?
Khuni Ganpati
| Updated on: Sep 07, 2024 | 12:41 PM
Share

dhule khuni ganpati: महाराष्ट्रातील शहर शहरात गणशोत्सवाचा उत्सव सुरु आहे. या उत्सवानिमित्त वाजत गाजत गणराया घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आणले जात आहे. मानाच्या गणपतीची मिरवणूक सुरु आहे. धुळे शहरातील मानाचा गणपती असलेला खुनी गणपतीचे जल्लोषात आगमन झाले आहे. या गणपतीला खुनी गणपती म्हटले जाते? त्याला हे नाव पडले तरी कसे? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचा रंजक इतिहास आहे. इतिहासातील त्या घटनेनंतर या गणपतीचे विसर्जन मशिदीतील मौलानाकडून आरती झाल्याशिवाय होत नाही. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणूनही हा गणपती प्रसिद्ध झाला आहे.

त्या घटनेनंतर खुनी गणपती नाव

लोकमान्य टिळकांनी1894 ला गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर धुळ्यात 1895 पासून गणेशोत्सव सुरु झाला. खांबेटे गुरुजींनी 1895 मध्ये खुनी गणपतीची स्थापना झाली. धुळे जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून खुनी गणपतीची ओळख आहे. या गणपतीला खुनी का म्हटले जाते, त्याचा असा इतिहास आहे. या गणरायाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरुन पालखीतून जात होती. त्यावेळी पालखीला विरोध केला गेला. त्यामुळे त्या ठिकाणी तुंबड हाणामारी झाली. ब्रिटीशांना घटनास्थळावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या मशिदजवळ खूनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव पडले. या घटनेनंतर ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला. दोन्ही धर्माच्या सन्मानासाठी त्यावेळी 228 रुपये दोन्ही गटांना दिले.

मौलानाकडून आरतीची पडली प्रथा

धुळ्यात अनंत चर्तुदशीच्या दिवशी गणपती विसर्जन होते. मानाचा गणपती असलेल्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाची साथेवर भाविक नृत्य करत सायंकाळी 5 वाजता मशिदीजवळ येतात. त्यावेळी नमाजची अजान होते. खुनी गणपती मशिदीच्या दाराच्या दारासमोर येताच गणपतीवर पुष्पवृष्टी होते. त्यानंतर मशिदीचे मौलाना फुलांचा हार अन् आरती घेऊन येतात अन् मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात. त्यानंतरच मिरवणूक पुढे जाते.

धुळ्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा निर्माण झाल्यानंतर याठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचाही अनुभव भाविकांना येतो. धुळ्यात गेल्यावर जुने धुळे भागात ही खुनी मशीद आहे. त्या ठिकाणी बस थांबा खूनी मशिद नावाने आहे. मशिदीच्या प्रशासनाने गणपतीची परंपरा जपली तशी जुन्या धुळ्यातील हिंदूबहुल कॉलनीतील लोकांनीही मशिदीचे पावित्र्य जपले आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.