AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचं काय झालं?

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते. मात्र आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे.

मोठी बातमी! दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं, धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचं काय झालं?
Dipak Borhade
| Updated on: Oct 02, 2025 | 5:04 PM
Share

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालना येथे आमरण उपोषणाला बसले होते. मात्र आता दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. 16 दिवस आमरण उपोषण केल्याने दीपक बोऱ्हाडे यांची प्रकृती खालावली होती. समाज बांधवांच्या विनंतीनंतर आपल्या मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे. त्यांच्या मागणीचं नेमकं काय झालं? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं

मागील 16 दिवसापासून जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे उपोषण करत होते. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती.16 दिवस आमरण उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी उपचार घेण्याची देखील विनंती केली होती. आता त्यांनी समाज बांधवांच्या विनंतीनंतर आपल्या मुलीच्या आणि मावशीच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं आहे.

आरक्षणाच्या मागणीचं काय झालं?

दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सोडलं आहे. त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दीवप बोराडे हे उपचार घेणार आहेत. दीपक बोराडे हे उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेतली होती. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी महाजन यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र बोराडे यांनी उपोषण मागे घेतले नव्हते.

त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बोऱ्हाडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. बोऱ्हाडे यांच्याशी फोनवर बोलताना फडणवीस यांनी म्हटले होते की, कोणीही काहीही बोलू द्या. मी काहीही लिहून दिलं तरी जोपर्यंत मी चर्चा करत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही. तुम्हालाही माहिती आहे की लोकांनी केसेस केल्या आहेत. आपण आरक्षणाबाबत आपण आपली बाजू मांडली. सर्वोच्च न्यायालयामुळेही यात अडचणी निर्माण झाल्या. एसटीचे आरक्षण केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मान्यतेने देते. त्यासाठी राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो. मागच्या सरकारने धनगर समाज एसटीत बसत नाही, असा अहवाल पाठवला.आरक्षण अजूनही आपल्याला हातून गेलेलं नाही. तुम्ही चांगला वकील द्या, तुम्ही प्रक्रिया समजून घ्या. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय आरक्षण मिळू शकतात नाही. एसटीचे संवैधानिक आरक्षण आहे. त्यामुळे त्याची एक प्रक्रिया आहे. तुम्ही चर्चा करा आपण मार्ग काढू.’

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....