AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! हिंदीच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये मतभेद, नेमकी भूमिका काय?

राज्यात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. याच मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मात्र दुसरीकडे या मुद्द्यावर महायुतीमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे.

मोठी बातमी! हिंदीच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये मतभेद, नेमकी भूमिका काय?
| Updated on: Jun 27, 2025 | 5:33 PM
Share

हिंदीवरून महायुती सरकारमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची भूमिका एकच आहे. राज्यात हिंदीची सक्ती नाही, तर मराठीची सक्ती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, तर अनिर्वाय असा शब्द आम्ही हटवला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी थेट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

हिंदीच्या वादावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, मात्र दुसरीकडे हिंदीच्या वादावरून सरकारमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे. पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी भूमिका अजित पवार यांची आहे, तर राज्यात मराठीची सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अनिर्वाय शब्द हटवण्यात आला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सरकारमध्ये असून अजित पवार यांचा हिंदीला विरोध आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार

काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मला असं वाटतं पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, पाचवीपासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी भाषाच असावी, त्यांना मराठी शिकवावी. ज्यावेळी ते पहिलीपासून मराठी भाषा लिहायला आणि वाचायला शिकतात तेव्हा त्यांना हिंदी भाषा देखील लिहिता वाचता येते. फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवीपासून सुरुवात केली तरी काही हरकत नाही. तेव्हा पाचवीपासून हिंदी सक्तीची करावी.

तर दुसरीकडे यावर आक्षेप घेणाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ, अनिर्वाय शब्द काढला आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे यांची भूमिका ही भाजपला सुसंगत अशीच आहे. या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. मात्र या संदर्भात अजित पवार यांची वेगळी भूमिका असल्याचं पाहायला मिळत आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.