AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेवर कोणाची वर्णी? जय पवार की भुजबळ? जय पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, मोठं वक्तव्य

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमधून दोन नावाची चर्चा आहे. छगन भुजबळ आणि जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर आता जय पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यसभेवर कोणाची वर्णी? जय पवार की भुजबळ? जय पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, मोठं वक्तव्य
jay pawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 07, 2026 | 4:37 PM
Share

सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकल्या आहेत. सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीमधून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीमधून दोन नावाची चर्चा आहे, एक म्हणजे मंत्री छगन भुजबळ आणि दुसरं नाव राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांचं आहे. दरम्यान छगन भुजबळ यांनी याबाबत बोलताना आधीच आपली भूमिका जाहीर केली आहे. आपण राज्यसभेसाठी आग्रही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर यावर आता जय पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले जय पवार?  

राज्यसभेच्या जागेसाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. यावर बोलताना जय पवार म्हणाले की,  माझ्या नावाची चर्चा होत आहे, पण माझी काही इच्छा नाही. मी इथेच सर्वांच्या कामासाठी असणार आहे.  त्यानंतर त्यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की मग कोणाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर मात्र जय पवार यांनी सावध उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. मुंबईमध्ये काय घडामोडी सुरू आहेत मला माहित नाही. वहिनी आणि पार्थ दादा दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील.  परवा मी मुंबईला जाणार आहे, मला माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेन असं जय पवार यांनी म्हटलं आहे.

जनता दरबारावर प्रतिक्रिया 

जय पवार यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं, यावर देखील ते बोलले आहेत.  आज चांगला प्रतिसाद मिळाला. वाटलं नव्हतं एवढे लोकं येतील. पण लोकं समस्या घेऊन आले. रस्ता पाणी विज असे प्रश्न लोकं घेऊन येत आहेत. असं त्यांनी यावेळी म्हटलं. दादांचं प्रेम सर्वांच्या डोळ्यात अजूनही दिसतं. मी सुद्धा दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज अशा नागरिकांच्या समस्या आहेत, असं यावेळी जय पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?