AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंंदे गटात तुफान राडा, दादा भुसे रवाना होताच…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. श्रेयवादावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंंदे गटात तुफान राडा, दादा भुसे रवाना होताच...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 07, 2025 | 5:03 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिंदे गटात तुफान राडा झाला आहे. श्रेयवादावरून दोन जिल्हाप्रमुख आपसात भिडले आहेत. यामुळे शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, त्यांनी इथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, त्यांची बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना होताच शिवसेना शिंदे गटात राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोलीमध्ये शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, त्यांनी गडचिरोलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरला रवाना झाले, दादा भुसे हे चंद्रपूरला रवाना होताच, दोन जिल्हाप्रमुख एकमेकांवर भिडले, दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेय वादावरून तुफान राडा झाला, गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये ही घटना घडली आहे.

शिवसेनेचे गडचिरोलीचे जिल्हाप्रमुख संदीर ठाकूर आणि अहेरीचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यामध्ये हा राडा झाला आहे. दादा भुसे यांची गडचिरोलीच्या सर्किट हाऊसमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होती. त्यामुळे जिल्हाभरातील शिवसेनेचे  पदाधिकारी मोठ्या संख्येनं या बैठकीसाठी हजर होते, मात्र त्यानंतर मंत्री दादा भुसे चंद्रपूरकडे रवाना होताच दोन पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेय वादावरून हमरीतुमरी झाली आणि ते एकमेकांवर भिडले, या घटनेमुळे काही काळ बैठकीच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला.

अंतर्गत वाद चव्हाट्यावर  

मंत्री दादा भुसे हे आज गडचिरोली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी गडचिरोलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, या बैठकीला मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते, मात्र त्यानंतर दादा भुसे गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे रवाना होताच तिथे जोरदार राडा झाला, दोन जिल्हा प्रमुख आपसात भिडले, श्रेयवादावरून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे, आता या प्रकरणात पक्ष काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणामुळे तिथे चांगलाच गोंधळ उडाला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.