परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण, धनंजय मुंडेंच्या कामाचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक

धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचं मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

परळीत 585 कर्णबधिर दिव्यांगांना अत्याधुनिक डिजिटल श्रवण यंत्राचे वितरण, धनंजय मुंडेंच्या कामाचं सुप्रिया सुळेंकडून कौतुक
धनंजय मुंडे यांच्याकडून दिव्यांगांना श्रवणयंत्राचे वाटप
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 2:51 PM

परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्यभरातील दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकार, केंद्र सरकार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अशा विविध माध्यमातून विविध सहाय्यक उपकरणे मिळवून देण्याची एक आगळी वेगळी यशस्वी चळवळ सुरू झाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या या कामाचा अभिमान असल्याचं मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, बीड जिल्हा आरोग्य विभाग, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना आणि स्वरूप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात 585 गरजू दिव्यांग व्यक्तींना सुमारे 25 हजार रुपये किमतीचे डिजिटल श्रवण यंत्र मोफत वाटप करण्यात आलं. (Distribution of digital hearing aids to 585 deaf people in Parli)

जन्मजात कर्णबधिर असलेल्या किंवा काही कारणांनी श्रवणशक्ती गमावलेल्या व्यक्तीच्या कानात जेव्हा आपल्या प्रयत्नातून आवाज ऐकू येतो, त्याचे समाधान अन्य कोणत्याही मोठ्या कामापेक्षा श्रेष्ठ ठरते, असं मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यातील वंचित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ऊसतोड कामगारांचे महामंडळ असेल किंवा देशातील तृतीयपंथीयांचे पहिले महामंडळ असेल असे अनेक नवनवीन उपक्रम व योजना समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केल्या असल्याचा आनंद आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

‘प्रत्येक जिल्ह्यात ऑटिजम सेंटर उभारलं जाणार’

लातूरमधील सुरू केलेल्या ऑटिजम सेंटरच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ऑटिजम सेंटर उभारण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक उपकरणे वितरित करून त्यांचे जीवन सुकर करण्याचा उपक्रम संबंध राज्यात सक्रिय करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक पावले उचलण्यात येणार असल्याचंही मुंडे म्हणाले.

धनु भाऊंच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला… – सुप्रिया सुळे

दरम्यान या कार्यक्रमात पूर्व नोंदणी आणि तपासणी केलेल्या 585 कर्णबधीर दिव्यांगांना श्रवण यंत्र तज्ञ डॉक्टरांकडून बसवण्यात येत आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी मशीन बसवलेल्या एका ताईला, “ताई ऐकू येतंय का?” असे विचारताच त्या महिलेने मोठ्या आवाजात ‘हो भाऊ!’ असे उत्तर दिले, यावेळी हा कार्यक्रम सुप्रिया सुळे लाईव्ह पाहत होत्या.

सुळे यांनी याचा आपल्या मनोगतात आवर्जून उल्लेख केला की, “आमचे धनु भाऊ अत्यंत संवेदनशील नेतृत्व आहेत, त्या दिव्यांग व्यक्तीने हो, भाऊ आवाज येतोय म्हणून जेव्हा उत्तर दिले, तेव्हा धनु भाऊंच्या चेहऱ्यावरील आनंद केवळ केलेल्या कामाचे समाधान नाही तर खूप काही सांगून गेला!’ असे म्हणत सुळे यांनी मुंडेंच्या कामाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या :

Video : बाबासाहेबांच्या लिखाणात दंतकथांना स्थान नाही : राज ठाकरे

Nitin Gadkari letter to Maha CM : “मुंबई-गोवा हायवेवर काळे फासणारे, चिखलफेक करणारे तुमच्याबरोबर, गडकरी साहेब तिथे तुम्ही गप्प का?”

Distribution of digital hearing aids to 585 deaf people in Parli

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.