डोंबिवलीत रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत तिकीट ? फोटो व्हायरल झाल्यावर खळबळ

मराठमोळ्या डोंबविलीतील एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत प्रिंट झालेलं तिकीट मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हे तिकीट डोंबिवली ते घाटकोपर या स्थानकादरम्यानचे असून 8 मार्चला ते प्रिंट झाले होते.

डोंबिवलीत रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत तिकीट ? फोटो व्हायरल झाल्यावर खळबळ
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 9:23 AM

मुंबई | 14 मार्च 2024 : मराठमोळं, सुसंस्कृत, सुशिक्षितांचं शहर अशी डोंबिवलीची ओळख…मात्र याच मराठमोळ्या डोंबविलीतील एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत प्रिंट झालेलं तिकीट मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. हे तिकीट डोंबिवली ते घाटकोपर या स्थानकादरम्यानचे असून 8 मार्चला ते प्रिंट झाले होते.  तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रामध्ये (प्रिंटर) बिघाड झाल्याने असे तिकीट मिळाले. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे तिकीट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून त्यावरून प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.

काय आहे प्रकरण ?

मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. येथील डोंबिवली स्थानकातूनही लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्याच डोंबिवली रेल्वे स्टेशनवर मिळालेलं एक तिकीट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे. 8 मार्चला प्रिंट झालेल्या या तिकीटावरील भाषा गुजराती असल्याचा दावा काही प्रवाशांकडून केला जात आहे. डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे हे तिकीट असून या प्रकारामुळे सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. गुजराती भाषेतील या तिकिटाविषयी काही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

गुजराती भाषेती तिकीटामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि महायुतीचे समर्थक हे मात्र, ते तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करत आहेत. तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने असे तिकीट प्रवाशांना मिळाले असावे, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.