AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, अंजली दमानियांचे गंभीर आरोप, म्हणाल्या…

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या कथित आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. कुटुंबियांनी ही हत्या असल्याचा दावा करत न्यायव्यवस्थेकडे मागणी केली आहे.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, अंजली दमानियांचे गंभीर आरोप, म्हणाल्या...
Dr Gauri Palve-Garje Case
| Updated on: Nov 23, 2025 | 12:58 PM
Share

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येप्रकरणी आता विविध आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला आहे. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत गर्जे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.

अंजली दमानिया यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्याय कशाला म्हणायचे हे कळत नाही. डॉक्टर मुलीची आत्महत्या आहे. गौरी आत्महत्या करेल अशी बिल्कुल मुलगी नव्हती. लग्नात आई वडील असताना त्यांना ही घटना कळाली. एका स्टेटमेंट मध्ये आत्महत्या केली असे म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांच्या तपासानंतर आणि डॉक्टर रिपोर्टनंतर ही हत्या आहे की आत्महत्या हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

तिने आत्महत्या केली की तिचा घात केला

गौरी साधी होती, पण स्ट्राँग होती. आत्महत्या करेल अशी ती मुलगी नव्हती. गौरीच्या आईवडिलांना रात्री पावणे सातच्या आसपास कळालं. ते बीडला लग्नात होते. तिथून ते वरळी पोलीस ठाण्यात आले. त्याच्या आधी त्यांना मुलीला अशा अवस्थेत नायर हॉस्पिटलमध्ये पाहावं लागलं. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर व्हायला वेळ लागला. आधी स्टेटमेंटमध्ये आत्महत्या केली असं म्हटलं होतं. पण वडिलांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही तिने आत्महत्या केली की तिचा घात केला. तर आताचे एसीपी चांगले आहेत. त्यांनी ताबडतोब करेक्शन केलं. आम्ही त्यांना सांगितलं. आता एफआयआर केला आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असा एफआयआर आहे. पोस्टमार्टेममध्ये घात झाल्याचं निष्पन्न झाल्यावर सप्लिमेंटरी जोडून ३०२चा गुन्हा दाखल करू असं पोलिसांनी सांगितलं. ते फॅक्ट आहे. मी दोन सरकारचे पीपी आहेत. त्याबाबत कन्फर्म केलं. डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी महाराष्ट्रात होत आहे. अशा लोकांना काय म्हणायचं. शिक्षा झाली पाहिजे हे आपण तेच तेच बोलतो. आधी वैष्णवी झाली. नंतर संपदा झाली. संपदाही बीडचीच होती. आता गौरी. आईवडिलांनी काबाडकष्ट करून मुलींना उच्चशिक्षित केलं. त्यानंतर हे होत असेल तर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला.

मुलीच्या आईवडिलांना यायला वेळ लागला

गौरी पालवे असे तिचे नाव होते. ती स्ट्रॉँग मुलगी आहे. तिने आत्महत्या केली वाटत नाही. अनंत गर्जे हा तिचा पती आहे. मला यात राजकारण आणायचं नाही. दुख होतंय की पंकजा मुंडे यांना रात्री कळलं असेलच. त्यांनी रात्री पोलिसांना फोन करून चांगली कारवाई करा. माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई करा. असं पंकजाने म्हणणं अपेक्षित आहे. त्यांनी ते म्हणावं ही विनंती आहे. मुलीचे आईवडिलांना यायला वेळ लागला. त्यामुळे एफआयआर झाला. सकाळी साडे तीनला आले. त्यानंतर आता ११ वाजता एफआयआर दाखल केला. आत्महत्या केली असं म्हटलं गेलं. मी आणि तिच्या वडिलांनी त्याला आक्षेप घेतला, असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.