AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरेंना आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे.

ठाकरे गटाला गळती का लागली? एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच सांगितलं मोठं कारण
| Updated on: Feb 16, 2025 | 10:28 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले? 

विधानसभेत महायुतीला विजय मिळाला, तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मिळेल. दोन-चार माणसं सोडली तर कोण खुश आहे? म्हणून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, हे तुम्ही पाहात आहात. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला लोक का सोडून जात आहेत याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली, ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा, असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, लोक स्वतःहून पक्षात येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. विकास विरोधी जे आहेत त्यांना कार्यकर्ते सोडत आहेत, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप द्या, मात्र काही लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या शाप देतात. कार्यकर्त्यांमुळे महाराष्ट्रात यश मिळाले आहे, अडचणीच्या वेळी त्याच्या पाठीमागे थांबण नेत्याचं काम आहे. पाठीशी उभे राहणारे नेते पाहिजेत नाही तर आप आगे बढो हम कपडे सभालते हें अस नको व्हायला, असा टोलाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

महादजी शिंदे पुरस्कार मला मिळाला, मात्र पोटदुखी काय थांबेना,गेल्या अडीच वर्षांपासून ही पोटदुखी सुरूच आहे औषध जर कंपाउंडर देतो तर रोगावर इलाज होईलच कसा? असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.