AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण…, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं होतं. त्यानंतर आता बड्या नेत्यानं एकनाथ शिंदेंबाबत देखील असंच विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण..., बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ
Eknath ShindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 17, 2026 | 2:16 PM
Share

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला होता, गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, सोनिया गांधी यांनी मुंडे यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवा कंदिल देखील दाखवला होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांचा प्रवेश होऊ शकला नाही, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान हुसैन दलवाई यांच्या या वक्तव्यावर अजून एकनाथ शिंदे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत जो दावा केला आहे, तोही खरा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडे हे भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, सगळं ठरलं होतं. ते सोनिया गांधी यांची भेट घ्यायला निघाले असतानाच त्यांना अहमद पटेल यांचा फोन आला, तुम्ही आधी राजीनामा द्या आणि नंतर निवडून या अशी अट त्यावेळी अहमद पटेल यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर ठेवली, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये येऊ शकले नाहीत. मला वाटतं ही काँग्रेसची सर्वात मोठी चूक होती, असा दावा हुसैन दलवाई यांनी केला आहे.

शिंदेंबाबत काय म्हणाले?

हुसैन दलवाई यांनी असा दावा केला आहे, की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं आहे. यावर अजून एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र दलवाई यांच्या या दाव्यानंतर आता चर्चेला उधाण आलं आहे. तर दुसरीकडे महादेव जाणकर यांनी देखील गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या जाचाला कंटाळले होते, त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार सुरू होता, असं म्हटलं आहे.

Follow Us
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता