AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवाारांच्या जागी कोण? लॉबिंग सुरू होणार? राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या निवडणुकीची तारीख जाहीर

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवाारांच्या जागी कोण? लॉबिंग सुरू होणार? राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या निवडणुकीची तारीख जाहीर
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
| Updated on: May 22, 2026 | 11:11 AM
Share

राज्यसभेच्या एकूण 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. या 24 जागांवर 18 जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांतील खासदार निवृत्त झाले आहेत. तर काहींनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली असून त्याजागी राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागलं आहे. या जागेसाठी मोठी लॉबिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कुणाला राज्यसभेत पाठवणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सुनेत्रा पवारांसह तामिळनाडूतील एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. येत्या 8 जूनपर्यंत राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर 18 जूनला रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जागी राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे निवृत्त…

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह निवृत्त झाले आहेत. केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन हे सुद्धा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे या जागांवर त्यांचीच वर्णी लागणार की इतर कुणाला संधी मिळणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

या राज्यात निवडणूक

कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी चार जागा रिक्त होत आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेशातून प्रत्येकी तीन जागा तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आमि झारखंडमधून प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. याशिवाय झारखंड, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 22 निवृत्त खासदारांपैकी 11 भाजपचे आणि काँग्रेसचे चार खासदार आहेत.

18 जून रोजी मतदान

निवडणूक आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार, 1 जून रोजी नोटिफिकेशन जारी होईल. 8 जून रोजी नामांकन भरता येणार आहे. 9 जून रोजी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर 11 जून रोजी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यानंतर 18 जून रोजी मतदान होईल. सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मात्र, अधिकचा उमेदवार रिंगणात नसेल तर मतदान होणार नाही. बिनविरोध निवडणूक जाहीर केली जाईल.

Follow Us
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघड्यांचे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघड्यांचे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं, महाजन यांचा पत्ता कट?
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती