AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Raut: ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू; नितीन राऊत यांचा इशारा

nitin raut: राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाला जोरदार विरोध केला आहे.vखासगीकरणाला माझा व महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) विरोध असून यासंदर्भात मी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून भूमिका स्पष्ट केली आहे.

Nitin Raut: ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू; नितीन राऊत यांचा इशारा
ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू; नितीन राऊत यांचा इशारा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2022 | 5:55 PM
Share

शिर्डी: राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाला जोरदार विरोध केला आहे.vखासगीकरणाला माझा व महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) विरोध असून यासंदर्भात मी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून भूमिका स्पष्ट केली आहे. ऊर्जा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची पालक या नात्याने पूर्ण काळजी घेणार आहे. ऊर्जा विभागातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देतानाच ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या शिर्डी (shirdi) येथे आज आयोजित 20व्या द्विवार्षिक महाअधिवेशनाला उद्घाटक म्हणून राऊत यांनी आज संबोधित केले. यावेळी ते कामगारांना संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी त्यांच्याहस्ते संघटनेच्यावतीने प्रकाशित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणासाठी गेल्या दोन तीन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. वीज कायद्यात दुरुस्ती करून खासगीकरणाचा दबाव वाढविला आहे. मात्र महाराष्ट्र सरकार या दबावाखाली बळी पडणार नाही आणि ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण होणार नाही, अशी ठाम भूमिका नितीन राऊत यांनी मांडली. केंद्राच्या खासगीकरणाच्या धोरणाला मी वेळोवेळी पत्र लिहून आणि बैठकांमध्ये विरोध केला आहे असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले. वीज कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असून, मी सुद्धा गरीब व कष्टकरी कुटुंबातील असून त्यामुळे कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली.

कामगारांना सलाम

कोरोना, चक्रीवादळ, पूरपरिस्थिती वा कुठल्याही आपात्कालीन स्थितीत जीवावर उदार होऊन वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कार्य कामगारांनी केले आहे. दुर्गम भाग तसेच रायगड किल्ल्यावर सुद्धा वीज यंत्रणा उभी केल्याबद्दल त्यांनी कामगारांचे कौतुक केले. मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये वीज पुरवठा बंद झाला तेव्हा 450 प्रति किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याची पर्वा न करता आपल्या कामगारांनी काही तासात वीज पुरवठा सुरळीत केला, याबद्दल माझा तुम्हा सर्वांना सलाम आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तांत्रिक कामगार हे ऊर्जा विभागाचे कान आणि डोळे आहेत, असेही ते म्हणाले.

बिल भरून सहकार्य करा

महावितरणवर थकबाकी व कर्जाचा डोंगर उभा असताना सुद्धा कोरोना काळात आणि आज वाढते तापमान व कोळसा टंचाई चे संकट असताना सुद्धा मागणी एवढा वीजपुरवठा राज्यात केला जात आहे, ग्राहकांनी सुद्धा याची जाण ठेवून नियमित व वेळेत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी वीज धोरण 2020च्या माध्यमातून शेतकऱ्यांना थकबाकी मुक्तीसाठी तथा ग्रामीण भागातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यासाठी सॊबतच कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना आणली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

ऊर्जा मंत्र्यांचे डोळे पाणावले

यावेळी बोलताना गरिबीचे चटके काय असतात याची मला कल्पना आहे, असे सांगताना त्यांनी बालपणीच्या खडतर आठवणी सांगितल्या. “गिरणी कामगार असलेल्या वडिलांच्या पायाला पकडून जेव्हा मी सायकल घेऊन मागितली तेव्हा ते मला 300 मीटर तसेच फरफटत पुढे घेऊन गेले. बेटा माझ्याकडे तुला सायकल घेऊन देण्यासाठी पैसे नाहीत,” हे सांगताना राऊत यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

संबंधित बातम्या:

मोठी बातमीः शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार, नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा

Kirit Somaiya on Sanjay Raut: पत्रा चाळ घोटाळ्यातील संजय राऊत यांच्या सहभागाची चौकशी करा, किरीट सोमय्या यांची मागणी

Beed : मशिदीवरच्या भोंग्यातून अजान सुरु झाली अन् समोर त्याचवेळेस हनुमान चालिसा लागली, तणावाची शक्यता?

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.