AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय…, संग्रामबापू भंडारेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे चांगलेच चर्चेत आले होते, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा जालन्यात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय..., संग्रामबापू भंडारेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2025 | 4:55 PM
Share

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वादानंतर संग्रामबापू भंडारे हे चांगलेच चर्चेमध्ये आले होते, त्यांच्यावर टीका देखील झाली होती, दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते जालन्यात बोलत होते. गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले भंडारे? 

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, माझा लय व्हिडिओ फिरवला की याला लॉरेन्स बिश्नोईचा का पुळका आहे? भारतातील एका नटाकडून हरिण मारले गेले, तेव्हा बिश्नोई समाजाने मागणी केली होती की माफी मागा. पण तेव्हा दाऊदचा काळ होता, खान कुठे माफी मागतो?  परंतू बिश्नोई समाजाच्या घरामधील एक छोटं पोरगं मोठं झालं, त्याचं नाव लॉरेन्स बिश्नोई, त्याच्यावर जे गुन्हे आहेत ते काही खिसे कापणे, चाकू दाखवणे असे नाहीत. तो परदेशात फोन लावतो, कोणत्याही देशात जा, त्याचे सात -आठ कार्यकर्ते आहेतच.

त्याने खानला मेसेज टाकायची सुरुवात केली की मी तुला ठोकणार आहे, देशभर एक मेसेज निर्माण झाला की हरीण मारलं की लॉरेन्स ठोकतो. त्यामुळे देशातील हरणं सुरक्षित झाले, आता गाय वाचवण्यासाठी जी परिस्थिती निर्माण होईल, त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल. जालन्यातील अनवा गावांमध्ये गाईची आणि देवळाची विटंबना झाली, यांच्या टारगेटवर गाई आणि देऊळ आहेत, पोलिसांनीही  हिंदूच्या पाठीमागे उभा राहावं, असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटलं आहे.

गावात जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले, तर दुसऱ्या रामाच्या घोषणा द्या ज्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशभरातील मंदिरांना सरकारच्या वतीने कॅमेरे लावले पाहिजेत.  महाराष्ट्रातील प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी, भगवाधारी बनवायचा आहे, असंही यावेळी संग्रामबापू भंडारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान बाळासाहेब थोरात यांच्याशी देखील काही दिवसांपूर्वी त्यांचा चांगलाच वाद झाला होता.

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.