AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : शिवसेनेसमोर आता नवा पेच, एकनाथ शिंदे हे कोडं कसं सोडवणार?

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. मात्र त्यापूर्वी आता एकनाथ शिंदे यांच्यापुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे, यातून ते कसा मार्ग काढणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Explainer : शिवसेनेसमोर आता नवा पेच, एकनाथ शिंदे हे कोडं कसं सोडवणार?
| Updated on: Aug 02, 2025 | 6:25 PM
Share

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात. सर्वच पक्षांनी आपल्या स्थरावर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष या निवडणुका एकत्र लढणार की वेगवेगळ्या? याबाबत अद्याप चित्र पुरेस स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती देखील होऊ शकतात, मात्र ती अपवादात्मक परिस्थिती असेल, सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जर महायुतीमधील सर्व घटक पक्ष ही निवडणूक एकत्र लढले तर कोणाच्या वाट्याला किती जागा येणार? कोणाचा किती वाटा असणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे सर्व घडत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे, तो म्हणजे तीन दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यामध्ये शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेत 11 जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले आहेत. पक्षातील लोकसभा संपर्क प्रमुख संजय साठे यांच्या विरोधात ही सर्व मंडळी आता आक्रमक झाली आहेत.  संजय साठे यांनी शिवाजी सावंतांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याची या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे.   मात्र शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी अद्यापही या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान आज शिवसेनेच्या आकरा  पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असले तरी आगामी काळात आणखी काही जिल्हाप्रमुख असलेल्या नेत्यांनी राजीनामा दिला तर याचा शिवसेना पक्षाला मोठा फटका बसू शकतो. त्यातच जर हे सर्व पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले तर मात्र शिवसेना शिंदे गटाला महापालिकेसाठी उमेदवार मिळणे देखील कठीण जाणार आहे. महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेला ही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे एकनाथ शिंदे ही धुसफूस थांबवण्यात यशस्वी होतील कां हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. शिंदे हे कोडं आता कसं सोडवणार? हे पाहावं लागणार आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.