AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; या महिन्यात होणार निवडणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगलीमध्ये बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; या महिन्यात होणार निवडणूक
Devendra Fadnavis Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 23, 2025 | 7:18 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं. दरम्यान आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे

मधल्या काळात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काय होणार? कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?   

देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात राज्यात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील, दीड महिन्यात या सगळ्याच निवडणुका उरकल्या जातील.  जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल, त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ताकतीने काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं आहे, ते सांगलीमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात आलं होतं. तेव्हा महाराष्ट्रातील संगळीच कामं थांबली होती, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेचं महाराष्ट्राच्या विकासासाठी यापुढे संस्थात्मक बदल करणं गरजेचं आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे  सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण व विविध विकासकामांचं उद्घाटन देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. कडेगाव आणि आटपाडी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचं देखील उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालं.  यावेळी सांगली पोलीस दलाला मिळालेल्या नवीन 19 वाहनांचं देखील लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते  करण्यात आलं.  या कार्यक्रमाला  सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विश्वजित कदम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.