AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जत्रेसाठी बकरा न दिल्याने कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार

डोंबिवलीच्या गावदेवीच्या जत्रेसाठी बकरा न दिल्याचा राग आल्याने तरुणांच्या टोळक्याने एका तबेला चालकाच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

जत्रेसाठी बकरा न दिल्याने कुटुंबावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला, डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
| Updated on: Apr 13, 2026 | 4:44 PM
Share

गावदेवी जत्रेसाठी बकरा न दिल्याने एका कुटुंबावर टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली येथील कुंभारखान परिसरात घडली आहे. या प्रकरणात सात जणांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री अडीच वाजता काही तरुणांनी तबेल्यावर हल्ला करीत या कुटुंबाला बेदम मारहाण केली.या टोळक्याने ऑटो रिक्षातून येऊन तबेला चालक, त्याचा भाऊ आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीत गावदेवीची जत्रा सुरु आहे.कुंभारखान परिसरात राहणारे आशिष विठ्ठल दळवी यांचा तबेला आहे. या तबेल्यात बकरी आणि म्हशी आहेत. या परिसरात गावदेवीची जत्रा सुरु आहे. आशीष दळवी यांच्या तबेल्यात सुजल भोसले नावाचा तरुण आला होता.त्याने तबेल्याचा चालक आशिष दळवी याला देवीच्या जत्रेसाठी बकरा मागितला. यावेळी आशीष याने उद्या सकाळी या, मी आईला सांगून ठेवतो असे सांगितले. काही वेळात सुजल भोसले त्याचे मित्र विनय हेगडे,प्रमोद ठाकरे,यज्ञेश खंडागळे,अक्षय खंडागळे आणि अन्य दोन साथीदारांना रिक्षाने घेऊन आला. आणि त्याने आशीष आणि त्याची आई तसेच मोठ्या भावाला मारहाण जबर मारहणा केली.

सकाळी बोलवल्याचा राग

डोंबिवलीच्या कुंभारखान भागात गावदेवीची जत्रा सुरु आहे. या भागातील काही तरुणांनी येथील तबेल्यातील चालक आशीष दळवी यांच्याकडे बकऱ्याची मागणी केली होती. मात्र,त्यांच्यात यावरुन वाद निर्माण झाल्याने तसेच आशीष याने लागलीच बकरा न देता उद्या सकाळी या असे सांगितल्याचा राग येऊन सुजल भोसले आणि त्याच्या मित्रांनी आशीष , त्याची आई आणि मोठ्या भावाला जबर मारहाण केली. या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?