AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील दहिसरमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू 5 ते 6 जण गंभीर जखमी!

दहिसर पूर्व परिसरातील जनकल्याण इमारतीत आग लागल्याची घटना घडली. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून यात एकाचा मृत्यू तर पाच ते सहा जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईतील दहिसरमध्ये भीषण आग, एकाचा मृत्यू 5 ते 6 जण गंभीर जखमी!
mumbai fire
| Updated on: Sep 07, 2025 | 10:24 PM
Share

मुंबईच्या दहीसर पूर्व परिसरातील जनगल्याण इमारतीत आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. रविवारी (7 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता येथे 24 मजली इमारतीला आग लगली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून शेवटी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच ते सहा नागरिक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, ही दुर्घटना झाल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार दहिसर पूर्व भागात जनकल्याण नावाची एसआरए इमारत आहे. ही इमारत एकूण 24 मजली आहे. याच इमारतीत अचानक आग लागली. आगीची घटना घडताच तत्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाने कोणताही विलंब नकरता आग विझविण्यास सुरुवात केली. तसेच आगीत सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितठिकाणी हलविण्यासाठी बचावकार्य राबवण्यात आले. या काळात नागरिकांना तत्काळ सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तरीदेखील खबरदारी म्हणून या परिसरात पोलीस, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत.

आगीवर कसे नियंत्रण मिळवण्यात आले?

दहिसरमधील जनकल्याण इमारतीवर आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे सात फायर इंजिन, 3 जम्बो टँकर, 2 ऑटो वॉटर टँकर, 1 ब्रिथिंग अपरेटस व्हॅन, 1 हाय प्रेशर पंप, एक ALP, एक टर्बनल लँडर, 1 HRFFV, 1 WQRV आदी उपकरणे घटनास्थळी नेण्यात आले आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीवर दुपारी 4 वाजून 32 मिनिटांनी नियंत्रण मिळविण्यात आले. आग लागल्याचे समजताच जनकल्याण इमारतीतील विजेचा पुरवठा खंडीत करण्यात आला. तसेच इमारतीच्या अंतर्गत असलेली आग विझविण्याची यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. लोकांनी इमारतीच्या खाली मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या जखमींवर उपचार केले जात आहेत. आग नेमकी का लागली? याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र इमारतीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. लवकरच या घटनेची चौकशी करून आगीचे नेमके कारण समोर येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.