वडिलांच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी काल (23 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थित डी. वाय. पाटलांनी अधिकृत प्रवेश केला. मात्र, काल दिवसभार या पक्षप्रवेशावर पाटील कुटुंबातून कुणाचीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे […]

वडिलांच्या 'राष्ट्रवादी' प्रवेशानंतर सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

कोल्हापूर : बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी काल (23 डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थित डी. वाय. पाटलांनी अधिकृत प्रवेश केला. मात्र, काल दिवसभार या पक्षप्रवेशावर पाटील कुटुंबातून कुणाचीच प्रतिक्रिया आली नव्हती. अखेर डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मौन सोडलं आहे.

काय म्हणले आमदार सतेज पाटील?

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश करण्याचा निर्णय कुटुंब म्हणून आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, अशी पहिली प्रतिक्रिया डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पुत्र आमदार सतेज पाटील यांनी दिली.

तसेच, दादा (डॉ. डी. वाय. पाटील) बरेचसे निर्णय स्वतःच्या पातळीवर घेतात, असेही सांगातना आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय आमच्या कानावर घालणे अपेक्षित होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने तसे केले नाही, याचे वाईट वाटते आहे.” अशीही खंत सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

शिवाय, काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी आतापर्यंत जोमाने काम केले, यापुढेही करत राहणार आहे, असेही आमदार सतेज पाटील यांनी नमूद केले.

डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. डॉ. डी. वाय. पाटील हे याआधी काँग्रेसमध्ये सक्रीय होते.

सतेज पाटलांना धक्का

डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत, तसेच ते माजी गृहराज्य मंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला होता.

कोण आहेत डी. वाय. पाटील?

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव काम आहे. केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. डॉ. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.

1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

डी. वाय पाटील यांच्या शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था (सौजन्य विकिपीडिया) :

  • डी वाय पाटील विद्यानगरी
  • डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
  • डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कँपस), चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे
  • डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे

शाळा

  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी, मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पुणे
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, अँटवर्प, बेल्जियम

महाविद्यालये

  • डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
  • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर

विद्यापीठे

  • पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर

हॉस्पिटल

  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर

क्रीडा संस्था

  • डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ-नवी मुंबई
Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.