AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धो धो पाऊस, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, 10 जिल्ह्यात मोठा अलर्ट, वारं फिरलं..

राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली. त्यातच पुन्हा वारं फिरल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. त्यातच काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. धो धो पाऊस कोसळला.

धो धो पाऊस, या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, 10 जिल्ह्यात मोठा अलर्ट, वारं फिरलं..
Rain
| Updated on: Oct 18, 2026 | 9:38 AM
Share

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवली. परतीचाही पाऊस चांगला झाला नाही. शेतीचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच आता पुन्हा राज्यात वारे फिरल्याचे बघायला मिळत आहे. राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. कोल्हापूर, चिपळूण, धुळे, मालेगाव, सांगलीतील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. महाराष्ट्रातील काही भागांत विशेषतः कोल्हापूर, सांगली, धुळे, नाशिक मालेगावसह काही परिसर आणि दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि दोन-अडीच महिन्यांच्यानंतर पुन्हा तुरळक व वादळी पावसाने हजेरी लावली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजेंच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

मुंबई आणि परिसरातही तुरळक ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मालेगाव बागलाण तालुक्यातील मुल्हेर परिसरात ऐन दुष्काळात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मेघगर्जनेसह जोरदार वादळासह पाऊस झाला. काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात असलेल्या काढणी योग्य पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. कांदा रोपांचे नुकसान होण्याची भीती  दुपारनंतर आलेल्या अचानक पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. प्रचंड उकड्यापासून नागरिकांचे काही प्रमाणात सुटका होईल.

अडीच महिन्यानंतर पावसाच्या सरी बरसताना दिसल्या.  वेळ निघून गेल्यावर आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात नाराजी बघायला मिळतंय. दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले. धरणांतील उपलब्ध साठा राखून ठेवण्याचा निर्णय, पुण्यासह पाच तालुक्यांतील सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता.दुष्काळी परिस्थितीत खडकवासला प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा कालव्यातून उन्हाळी आवर्तन देण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...