Raj-Uddhav Thackeray Alliance : मागच्या 10 दिवसात आतापर्यंत…राज-उद्धव ठाकरे युतीसंदर्भात सर्वात मोठी बातमी, Inside Story
Raj-Uddhav Thackeray Alliance : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाची युती कधी होणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हे दोघे बंधु एकत्र यावेत अशी अनेक मराठीजनांची इच्छा आहे. मागच्या दहादिवसात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. या युती संदर्भात महत्वाच्या अपडेट काय आहेत, ते जाणून घ्या.

पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत सर्वांना उत्सुक्ता लागलीय ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची. अनेक वर्षांपासूनची अनेकांची ही इच्छा पूर्ण कधी होणार? याकडे डोळे लागलेले आहेत. मागच्या काही महिन्यांमध्ये दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये सुसंवाद वाढल्याच दिसून आलय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन झालं असून त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. मनसे आणि उद्धव ठाकरे गट यांची युती घोषित होण्यासाठी अजून काही काळ वाट पहावी लागू शकते. राजकीय कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी अधिकृत युती जाहीर होईल अशी दाट शक्यता आहे.
पण मनसे आणि उबाठा यांची युती आकार घ्यायला सुरुवात झाली आहे. गेल्या 10 दिवसात संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. संजय राऊत यांनी राज ठाकरेंच निवासस्थान शीवतीर्थ येथे जाऊन भेट घेतली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. युती संदर्भात बोलणी ही जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मर्यादीत नसतात. प्रचारात कोणते मुद्दे असणार? कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये नवा भिडू घ्यायचा का? असे अनेक मुद्दे त्यात आहेत. संजय राऊत हे दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये दुवा म्हणून काम करतायत. मनोमिलनासाठी संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे गटाकडून कोण बोलणी करणार?
दोन्ही पक्षांकडून स्थानिक नेते जागावाटपाची बोलणी करणार अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईत वरुण सरदेसाई, अनिल परब, सूरज चव्हाण यांच्यावर जबाबदारी आहे. जागावाटपाच्या बोलणीत शेवटच्या क्षणापर्यंत काही पेच फसल्यास संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून सोडवणार आहेत. दोघांचे मतदारसारखे आहेत.
कुठे शरद पवार NCP ला सोबत घेण्यासाठी आग्रह?
पुण्यात उद्धव ठाकरे गटाकडून वसंत मोरे, आदित्य शिरोडकर आहेत. मनसे नेते अमित ठाकरे यांनी विभागवार विभाग अध्यक्षांच्या बैठका घेतल्या आहेत. कोणत्या जागा मागायच्या?आपली बलस्थानं कोणती? याची चाचपणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला. कोणत्या जागांवर दावा सांगायचा त्यावर चर्चा झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते ठाणे, पुण्यात शरद पवार यांच्या एनसीपीला सोबत घेण्यासाठी आग्रही आहेत.
