AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanth Khadse On Parth Pawar : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांचा नवीन गौप्यस्फोट, VIDEO

Ekanth Khadse On Parth Pawar : "मी राज्यात बदनाम झालो होतो. माझा कुठलाही संबंध नव्हता. माझ्या परिवाराने जमीन खरेदी केली होती. अँटी करप्शन ब्युरो झोटिंग समिती सर्वमार्फत चौकशा झाल्या. अनेक आक्षेप माझ्यावर झाले. मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, तरी देखील माझी ईडीची चौकशी सुरू आहे" असं एकनाथ खडसे म्हणाले.

Ekanth Khadse On Parth Pawar : पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांचा नवीन गौप्यस्फोट, VIDEO
Eknath Khadse-Parth Pawar
| Updated on: Nov 07, 2025 | 4:12 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना कशी मिळाली? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री आणि माजी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात भाष्य केलं आहे. “मुळात ही जमीन महार वतन जमीन आहे. 1955 ला ही जमीन सरकार जमा झाली. खाते उतारा बंद झाला तर या जमिनीची खरेदी होऊ शकत नाही. बेकायदेशीर रित्या जमिनीची खरेदी करण्यात आली” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. तुम्ही महसूल मंत्री असताना तुमच्यावर दबाव होता का? यावर एकनाथ खडसे म्हणाले की, “फाईल माझ्याकडे परवानगीसाठी आली होती. मी तपासल्यानंतर असं समजलं. 2013 मध्ये बाळासाहेब थोरात मंत्री असताना त्यांच्याकडे देखील फाईल आली होती. बिल्डर्स डेव्हलपर्स यांच्याकडून दबाव आणण्यात आला”

“ही सरकारची जमीन आहे. बेकायदेशीर रित्या खरेदी करणे हा फौजदारी गुन्हा आहे. यात ज्यांनीही सहकार्य केलं ते गुन्हेगार असतील. या प्रकरणात जे कागदपत्रे दाखवण्यात आलेले आहेत, ते चुकीचे दाखवण्यात आले आहेत. हा गुन्हा आहे” असं एकनाथ खडसे म्हणाले. सरकारमधील नेत्यांचे आणखी असे प्रकार उघडीकेस येऊ शकतात का? त्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, “शहरांमध्ये अशा प्रकारचे भूखंडाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सोन्याच्या खरेदी पेक्षाही भूखंडाचे प्रकार वाढले आहेत”

कृषी महाविद्यालयाची जागा ही बनावट कागदपत्र करून दुसऱ्याच्या नावावर लावण्यात आली

“पुण्यातलं हे दुसरे प्रकरण समोर आलं. पुण्यातलं कृषी महाविद्यालय जे बांधण्यात आलं आहे, इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेलं आहे. हा मोठा भ्रष्टाचाराचा विषय आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयाची जागा ही एका कुटुंबाची होती. या प्रकरणातही बनावट कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालयाची जागा ही बनावट कागदपत्र करून दुसऱ्याच्या नावावर लावण्यात आलेली आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आजही गुन्हा दाखल आहे. मात्र कुठलाही तपास नाही” असं एकनाथ खडसे म्हणाले.

ही भाजपाची खेळी असू शकते का ?

तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होता ही भाजपाची खेळी असू शकते का ? तुम्हाला बाहेर पडावं लागलं. “एखादी घटना घडली की तिचा कसा राजकीय वापर करून घ्यायचा जसं विरोधी पक्ष ठरवतो तसा सत्ताधारी पक्ष ठरत असतो. राजकीय भाग असू शकतो” असं उत्तर खडसे यांनी दिलं.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.