न्यायालयाच्या परिसरातच 4 कैद्यांचा पोलिसांवर हल्ला, कल्याण हादरलं
कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे, कल्याण न्यायालयाच्या परिसरातच चार कौद्यांकडून पोलीसावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

कल्याणमधून मोठी बातमी समोर येत आहे, या बातमीनं खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसावर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर, त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या प्रकरणात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना कल्याण न्यायालयाच्या परिसरात घडली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या परिसरातच कैद्यांनी पोलिसावर हल्ला केला आहे. कल्याणच्या कोर्टात 8 आरोपींना हजर केल्यानंतर, त्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कैद्यांना न्यायालयातून पुन्हा जेलमध्ये नेण्यासाठी पोलीसांनी गाडी बोलावली होती, पण गाडीत जागा कमी असल्यामुळे पोलीस नाईक किशोर पेटारे यांनी आरोपींना पाठीमागे जाऊन बसा सांगितले.
समोर आलेल्या माहितीप्रमाणे पाठीमागे बसण्यास सांगितल्यानं रागाच्या भरात चार आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. आकाश वाल्मीकी, गणेश उर्फ शालु मरोठीया, योगींदर उर्फ भोलु धरमवीर मरोठीया , विवेक शंकर यादव, असे या प्रकरणातील आरोपींची नावं असून, त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत शिविगाळ केली. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
गुन्हा दाखल
दरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला केल्यानं या घटनेनं खळबळ उडाली आहे, चार कौद्यांनी पोलिसावर हल्ला केला. या प्रकरणी आता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात चार आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कैद्यांनी न्यायालयाच्या परिसरातच पोलिसावर हल्ला केला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.
