हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची वाडिया हॉस्पीटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा विशेष उपक्रम

हृदयालाछिद्र असलेल्या लहानमुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हे शिबीर आयोजीत केले जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे.

हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची वाडिया हॉस्पीटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा विशेष उपक्रम
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 10:37 PM

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्ताने हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची वाडिया हॉस्पीटलमध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून हृदयालाछिद्र असलेल्या लहान मुलांची तपासणी तसेच शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार हे विशेष शिबीर आयोजीत केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय साहिता कक्ष वाडिया हॉस्पिटल आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने या शिबीराचे आयोजन केले जाणार आहे. शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी या शिबिराच्या उद्घाटन होणार आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मिताने हे शिबीर आयोजीत केले जाणार आहे.

हृदयालाछिद्र असलेल्या लहानमुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी हे शिबीर आयोजीत केले जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे.

या शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येईल. प्राथमिक तपासणी नंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनाआरोग्य योजने अंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

यासाठी पालकांनी वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी. शिवकुमार तडकर (मो.९७६९६४६०७०), नाव नोंदणीसाठी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे (मो.८९०७७७६००९), वैद्यकीय सहाय्यक स्वरूप काकडे (९८५१२३१५१५), वैद्यकीय सहाय्यक प्रसाद सूर्यराव (मो.८९०७७७६०१३) यांच्याशी संपर्क साधावा.

100 पैकी एका मुलाला असू शकतो हा धोका

100 पैकी एका मुलाला हृदयाला छिद्र असल्याचा धोका असतो. लहान मुलांच्या ह्रदयामध्ये असलेल्या छिद्रामुळे त्यांचा जीव धोक्यात येवू शकतो. यामुळे याचे निदान लवकरात लवकर होणे  गरजेचे असते.  वेळेत उपचार न केल्यास दोष वाढू शकतो. यासाठी पालकांमध्ये जागृती करणे गरजेचे असते.

ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार नेमका आहे तरी काय?

लहान मुलांमध्ये सर्वाधिक एएसडी,व्हीएसडी आणि पीडीए यांचे प्रमाण आढळून येते. यालाच हृदयातील छिद्र असे म्हणतात. हृदयात चार कप्पे असतात. पहिल्या दोन कप्प्यांना atrium असे म्हणतात, दुसऱ्या दोन कप्प्यांना ventricles असे म्हणतात. हृदयातून दोन मोठ्या रक्तवाहिन्या शरीराला अथवा फुफ्फुसाला रक्त पोहोचवतात. दोन्ही atrium मध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना atrial septal defect (एएसडी) असे म्हणतात. दोन्ही व्हेन्ट्रिकल्समध्ये जी छिद्रे आढळतात त्यांना ventricular septal defect (व्हीएसडी) असे म्हणतात. हृदयामधून निघणाऱ्या दोन्ही रक्तवाहिन्यांना जोडणारी एक रक्तवाहिनी असते.सही रक्तवाहिनी आईच्या पोटात असताना प्रत्येक अर्भकामध्ये असते, पण जन्म झाल्यानंतर ती बंद होते. ती बंद न झाल्यास उद्भवणाऱ्या आजाराला patent ductus arteriosus असे म्हणतात.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.