Gadchiroli Gram Panchayat | नक्षलवाद्यांची दहशत असलेल्या गडचिरोलीत 6,733 उमेदवार रिंगणात

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jan 10, 2021 | 1:28 PM

माओवाद्यांच्या दहशतीमुळे गेल्या अनेक वर्षांतील चित्र बघितल्यास ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते.

Gadchiroli Gram Panchayat | नक्षलवाद्यांची दहशत असलेल्या गडचिरोलीत 6,733 उमेदवार रिंगणात

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुठलीही निवडणूक असली की त्याला (Gadchiroli Gram Panchayat Election) माओवाद्यांचा सतत विरोध असतो. माओवाद्यांच्या दहशतीमुळे गेल्या अनेक वर्षांतील चित्र बघितल्यास ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. यावेळी तर अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागातल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे माओवादप्रभावित भागात लोकशाही व्यवस्थेला अनुकूल असे चित्र यावेळी पुढे आले आहे (Gadchiroli Gram Panchayat Election).

गडचिरोली जिल्हा माओवाद्यांच्या कारवायांमुळे सतत चर्चेत असलेला जिल्हा या जिल्ह्यात ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतची निवडणूक माओवाद्यांच्या दहशतीच्या सावटाखाली होते. प्रत्येक निवडणुकीला माओवाद्यांचा विरोध ठरलेला असतो.

पत्र आणि कापडी फलक लावून बहिष्काराचे आवाहन माओवादी करतात. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीस वर्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतिसंवेदनशील आणि अतिदुर्गम भागात उमेदवारी अर्ज दाखल करायला कुणीही पुढे यायचे नाही. माओवाद्यांकडून हल्ल्याची भीती दुसरीकडे अनेकांकडे अशिक्षितपणामुळे कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांना जमायचं नाही.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यात 3 हजार 89 जागांसाठी 6 हजार 733 उमेदवार रिंगणात आहेत. तर एटापल्ली धनोरा अहेरी सिरोंचा कोरची या अतिसंवेदनशील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दुसरीकडे, प्रशासकीय यंत्रणा सज्ज आली असून पोलीस निवडणुकीतल्या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेऊन आहेत.

Gadchiroli Gram Panchayat Election

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर हस्तक्षेप, शिक्रापूरच्या पीआयविरोधात पॅनेलचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

आईला चिन्हं आलं ऑटो, पठ्ठ्यानं ऑटोच घरावर ठेवला !

“ग्रामपंचायतीला दोन गट उभे राहतात; निवडून येतो, तो म्हणतो दादा आम्ही तुमचे” अजितदादांनी हशा पिकवला

ग्रामपंचायत धुरळा : अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेससमोर शिवसेनेचं आव्हान

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI