ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर हस्तक्षेप, शिक्रापूरच्या पीआयविरोधात पॅनेलचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

शिक्रापूरमधल्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याविरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत बेकायदेशीर हस्तक्षेप, शिक्रापूरच्या पीआयविरोधात पॅनेलचं थेट निवडणूक आयोगाला पत्र
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:25 PM

पुणे : जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत शिक्रापुरात निवडणुकीमुळे जोरदार वातावरण तापलंय. आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडालेला आहे. एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतो, हे ठरलेलं गणित… मात्र शिक्रापूरमधल्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याविरोधात थेट राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. तावसकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांना तत्काळ निलंबित करावे अन्यथा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकणार असल्याचे पत्र आज भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या प्रमुखांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे. (Shikrapur Bhairavnath Panel writes letter to EC against illegal interference in Gram Panchayat elections Shikrapur PI Umesh Tawaskar)

शिक्रापूर ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरात बसून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये 17 जागांसाठी तब्बल 160 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 50 अर्ज उमेदवारीसाठी शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे शिक्रापूर ग्रामस्थांची ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचे स्वप्न हे स्वप्न राहिले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सहाय्य करत आहे तर विरोधकांवर दबाव टाकून जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहेत तसेच समाजामध्ये जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देत दमदाटी करणे, असे आरोप भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने केले आहेत.

शिक्रापूर गावात गेल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांच्या प्रचार सभा आजतागायत ग्रामपंचायती समोरील मोकळ्या जागेमध्ये झाल्या, असं म्हणत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल यांनी ग्रामपंचायत समोरील मोकळ्या जागेत प्रचार सभा घेण्यासाठी ना-हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता मात्र शिरुर तालुका तहसीलदार यांच्या लेखी आदेशामुळे या प्रचार सभेला परवानगी शिक्रापूर पोलिसांनी दिली नाही. मात्र पीआय उमेश तावसकर यांनी जाणून-बुजून परवानगी नाकारली असल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने लिहिलं आहे.

यासंदर्भात पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “माझ्याविरोधात झालेले सगळे आरोप खोटे आहेत. या आरोपांचं मी खंडन करतो. माननीय तहसीलदार यांच्या आदेशानुसार सदरील जागेत सभा घेतल्याने पुणे-अहमदनगर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे वरील दोन्ही ठिकाणी सभा घेऊ नये, असे आदेश शिक्रापूर पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे या सभेची परवानगी नाकारण्यात आली. शिक्रापूर  पोलिस ठाण्याच्या हद्दीत 30 ग्रामपंचायत  निवडणूक  होत आहे मात्र अद्याप एकही आचारसंहितेचा भंग झाल्याचा गुन्हा दाखल झालेला नाही”, असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिलं. (Shikrapur Bhairavnath Panel writes letter to EC against illegal interference in Gram Panchayat elections Shikrapur PI Umesh Tawaskar)

संबंधित बातम्या

वयाच्या 73 व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात, सलग 10 वी पंचवार्षिक, एकदाही पराभूत नाही, हरिव्दार यांची गोष्ट

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.