Pune: गणेश काळे खून प्रकरणात मोठी अपडेट, तपास अधिकाऱ्यांची मोठी मागणी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Ganesh Kale Murder Case: पुण्याच्या कोंढव्यात शनिवारी गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी गोळ्या झाडून गणेशची हत्या केल्याचे समोर आले आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी काय घडलं ते जाणून घेऊयात.

गँगवॉरमुळे पुणे पुन्हा हादरले आहे. पुण्याच्या कोंढव्यात शनिवारी गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी गोळ्या झाडून गणेशची हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर कोयत्यानेही वार केल्याचे उघड झाले आहे. कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी मोठी मागणी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
तपास अधिकाऱ्यांची मोठी मागणी
आज अमन शेख, मयूर वाघमारे आणि अरबाज पटेल या तीन आरोपीना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी म्हटले की, या हत्येमागे आंदेकर टोळीच कनेक्शन आहे. 9 राउंड फायर केले आहेत. हे करायला कोणी सहकार्य केले? कटात कोण सहभागी आहे? पिस्तूल-कोयते कुठून आणले? याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्यात यावी.’
सरकारी वकिलांनी काय म्हटले?
सुनावणी वेळी सरकारी वकिलांनी, 9 गोळ्या झाडल्या 2 बंदुका सापडल्या, केवळ गोळ्याचं नाही तर कोयत्याने देखील मारले. तो जगलाच नाही पाहिजे अशा हेतूने मारण्यात आलं कोणी वाहन दिल? कोणी पैसे दिले? याचा तपास करायचा आहे, अशी माहिती दिली आहे.
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
यावेळी बोलताना आरोपींच्या वकिलांनी म्हटले की, हत्येत वापरण्यात आलेले 2 पिस्टल मिळाले आहेत. आरोपी 1-2-3 आधीच जेल मध्ये आहेत. या आरोपींना जुन्या गुन्ह्यात घ्याच आणि त्यांना या गुन्ह्यात आरोपी करायचं असं चित्र पोलिसांनी तयार केल आहे. ज्याला मारण्यात त्याचा भाऊ वनराज आंदेकर हत्येत सहभागी होता म्हणून त्या गुन्हाचा आणि या गुन्हाचा काय संबंध आहे? पोलीस कोठडीची गरज काय ? वाहन शोधण्यासाठी 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली तर हरकत नाही.
कोण आहे गणेश काळे?
समोर आलेल्या माहितीनुसार, मयत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खूनात वापरलेली पिस्तूले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. आता त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
